हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीच्या काठी स्कुटी व कॉलेजची बॅग ठेवून तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह पैनगंगा नदीपात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कनेरगाव नाका पोलिसांच्या वतीने सदर तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वाशिम रुग्णालयात हलवण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, पैनगंगा नदीवरील नवीन झालेल्या बायपास पुलावर १० नोव्हेंबर रोजी श्रेयस सोपान शिंदे (१९, रा. अंतुले नगर, हिंगोली) या तरुणाने आपली स्कुटी व कॉलेजची बॅग तसेच अंगावरील जॅकेट पुलावर काढून ठेवले होते. परंतु सदर तरुण सापडत नसल्याने वडील सोपान शिंदे यांनी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने गेली दोन दिवस वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्याचे विजय नरडे, राम कृष्ण इंगळे आदी कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. परंतु त्याचा शोध लागत नव्हता. अखेर १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पैनगंगा नदीवर श्रेयसचा मृतदेह तरंगत असताना काही शेतकऱ्यांना आढळला.

Mumbai Police : मुंबई पोलिसांतील २८ उपायुक्तांच्या केल्या बदल्या, पाहा कोणाची कुठे झाली बदली

सदरील मृतदेह शेतकऱ्यांच्या मदतीने नदीपात्रा बाहेर काढण्या आला आणि हा मृतदेह हा श्रेयस शिंदे याचा आहे असे लक्षात येताच वडील सोपान शिंदे यांना फोनवरून तात्काळ माहिती देण्यात आली. श्रेयस सोपान शिंदे याने नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या का केली, याबाबत पुढील तपास सध्या वाशिम ग्रामीण पोलीस करत आहेत. श्रेयसच्या जाण्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here