Husband wife relation problems | पत्नी दोन महिन्यापासून जवळ नसल्याने संतापलेला जावई शेख जफर हा सासुरवाडीला आला आणि पत्नी सोबत वाद घालू लागला. त्यामुळे सासू शकेरा परवीन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पती-पत्नीच्या वादामध्ये शासनाने मध्यस्थी केल्याने संतापलेल्या जावयाने सासूच्या डोक्यामध्ये रॉड मारून सासूला गंभीर जखमी केली. जावई इतक्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या मेहुण्याला देखील मारहाण केली.

हायलाइट्स:
- तस्सलुम बेगम या विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून छळ
- विष पाजल्यामुळे तस्सलुम बेगम या बेशुद्ध
तस्सलुम बेगम या विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून छळ करण्यात येत असल्यामुळे विवाहितेच्या काकाच्या घरी सदरील प्रकार मिटवण्यासाठी नातेवाईकांची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र बैठकीमध्ये तडजोड करणे ऐवजी सासरच्या मंडळीने तस्सलुम बेगम या विवाहितेला विष पाजले. विष पाजल्यामुळे तस्सलुम बेगम या बेशुद्ध पडल्याने त्यांना नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. पाथरी येथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आले होते. परभणी येथे उपचार सुरू असताना विवाहिता तस्सलुम बेगम यांनी दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या मंडळी विरोधात पाथरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पाथरी पोलीस करत आहेत. सासरच्या मंडळींनी चक्क वाद मिटवण्यासाठी बैठक सुरू असताना विवाहितेला विष पाजल्यामुळे नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जावयाचा सासूवर लोखंडी रॉडने हल्ला
पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने सासूने आपल्या मुलीला घरी आणले होते. मुलगी दोन महिन्यापासून घरी असताना जावई सासरवाडी मध्ये आला आणि तिच्यासोबत वाद घालू लागला हा प्रकार सासूच्या लक्षात आल्यानंतर सासूने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याने संतापलेल्या जावयाने सासूच्या डोक्यामध्ये रॉड मारून जखमी केल्याची घटना परभणी शहरातील अमन कॉलनी भागामध्ये घडली आहे. याप्रकरणी शकेरा परवीन यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी जावयाविरोधात नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख जफर याचा विवाह शकेरा परवीन यांच्या मुलीसोबत झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी मुलगी आणि जावयामध्ये वाद झाला होता. त्यामुळे शकेरा परवीन यांची मुलगी दोन महिन्यापूर्वी माहेरी अली होती.पत्नी दोन महिन्यापासून जवळ नसल्याने संतापलेला जावई शेख जफर हा सासुरवाडीला आला आणि पत्नी सोबत वाद घालू लागला. त्यामुळे सासू शकेरा परवीन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पती-पत्नीच्या वादामध्ये शासनाने मध्यस्थी केल्याने संतापलेल्या जावयाने सासूच्या डोक्यामध्ये रॉड मारून सासूला गंभीर जखमी केली. जावई इतक्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या मेहुण्याला देखील मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर सासू शकेरा परवीन यांनी नानलपेठ पोलीस ठाणे गाटुन दिलेल्या तक्रारी वरून जवाई शेख जफर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.