dombiwali news today, तरुण रात्री घरी आला आणि सकाळी झोपेतून उठलाच नाही; मित्रानेच घात केल्याचं उघड – a young man was beaten up by his friend out of anger for not bringing cigarettes in dombiwali
डोंबिवली : सिगारेट आणली नसल्याच्या कारणावरून मित्राने रागाच्या भरात मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना ४ नोव्हेंबर रोजी डोंबिवली पूर्व येथील पेंडसेनगरमधील तुषार इमारतीच्या समोर घडली. या प्रकरणी आता रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून शनिवारी रामनगर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या मित्राला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरीश्चंद उर्फ बकुळ रामदास चौधरी ( ३२ , रा. ठाकुर्ली ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सुषमा जाधव यांच्या फिर्यादीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. सुषमा जाधव यांचा भाऊ जयेश जाधव असे मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. जयेश आणि हरीश्चंद हे दोघेही चांगले मित्र होते. ४ नोव्हेंबर रोजी दोघेही दारू पिण्यासाठी भेटले. दारू प्यायल्यानंतर हरीश्चंद याने जयेशला सिगारेट आणण्यास सांगितले. मात्र जयेशने सिगारेट आणण्यास नकार दिला. याचा राग आल्याने हरीश्चंदने जयेशला मारहाण केली. या मारहाणीत जयेशच्या डोक्याला इजा झाली. काही वेळाने जयेश घरी गेल्यावर झोपला. मात्र सकाळी जयेश झोपेतून उठत नसल्याने कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी जयेशला मृत घोषित केले.