Maharashtra Political crisis | आम्ही महिला आघाडीच्यावतीने दीपाली सय्यद यांच्या पक्षप्रवेशाचा जाहीर विरोध करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिलांचा आदर करतात. पण कोणतीही विचारधारा नसलेल्या, आपली मतं सातत्याने बदलणाऱ्या तसेच कुठलीही पात्रता नसलेली दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समजले. मविआ सरकारच्या काळात दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्यं केली होती.

हायलाइट्स:
- …तरच दीपाली सय्यद यांना शिंदे गटात प्रवेश द्या
- भाजपची अट, मुख्यमंत्री शिंदे काय करणार?
मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्या व्यक्तींना शिंदे गटात खरंतर प्रवेश देताच कामा नये. आम्ही महिला आघाडीच्यावतीने दीपाली सय्यद यांच्या पक्षप्रवेशाचा जाहीर विरोध करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिलांचा आदर करतात. पण कोणतीही विचारधारा नसलेल्या, आपली मतं सातत्याने बदलणाऱ्या तसेच कुठलीही पात्रता नसलेली दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समजले. मविआ सरकारच्या काळात दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्यं केली होती. आमच्या दोन्ही नेत्यांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या दीपाली सय्यद यांना आमचा विरोध आहे, असे मृणाल पेंडसे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता दीपाली सय्यद या नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.
दीपाली सय्यद मोदींबाबत नेमकं काय म्हणाल्या होत्या?
मोदींनी मसणात जा अमित शाहांनी मसणात जा, महागाई आटोक्यात आणता येत नसेल ना तर हिमालयात जाऊन संन्यास घ्या, असं वक्तव्य दीपाली सय्यद यांनी केले होते. राणा दाम्पत्याच्या आंदोलनावेळी शिवसैनिकांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला चढवला होता. यावेळी शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक केली होती. तेव्हादेखील दीपाली सय्यद यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना मध्ये खेचले होते. ती गाडी मोदींची जरी असती तरी गाडीवर चप्पल आणि दगड पडलेच असते, कारण शिवसैनिकांना बाळासाहेबांची शिकवण आहे, अशा शब्दांत दीपाली सय्यद यांनी भाजपवर प्रहार केला होता.
दीपाली सय्यद यांची संजय राऊत आणि रश्मी ठाकरेंवर टीका
दीपाली सय्यद यांनी गेल्या आठवड्यात शिंदे गटात जाणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी दिपाली सय्यद यांनी संजय राऊत आणि रश्मी ठाकरे यांच्यावर थेट हल्ला करत आगामी वाटचालीचे संकेत दिले. मी एवढंच सांगेन की, संजय राऊत यांना त्यांच्या पापांची शिक्षा मिळाली. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत आहेत. त्यांच्यामुळे शिवसेनेते दोन गट पडले. शिंदे साहेबांनी मला शिवसेनेत आणले होते. त्यामुळे सद्यपरिस्थितीत शिंदे साहेबांसोबत उभे राहणे, हे माझे कर्तव्य असल्याचे दीपाली सय्यद यांनी म्हटले होते.
यावेळी दीपाली सय्यद यांनी आश्चर्यकारकरित्या रश्मी ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला. मुंबई महानगरपालिकेतून येणारे खोके बंद झाले, याची खंत रश्मी ठाकरे यांना आहे. नीलम गोऱ्हे किंवा सुषमा अंधारे या चिल्लर नेत्या आहेत. या सगळ्यातील महत्त्वाच्या सूत्रधार या रश्मी ठाकरे या आहेत, अशी टीकाही दीपाली सय्यद यांनी केली होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.