Kalyani Jadhav Death : कल्याणी जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच ‘प्रेमाची भाकरी’ नावाचे हॉटेल सुरू केले होते. मात्र शनिवारी रात्री डंपरने धडक दिल्याने त्यांचं निधन झालं आहे.

 

actress kalyani jadhav accident
कल्याणी जाधव अपघात
कोल्हापूर : ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव यांचं कोल्हापूर-सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक डंपरने धडक दिल्याने निधन झालं आहे. कल्याणी जाधव यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक लोकप्रिय मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

काही दिवसांपूर्वीच कल्याणी जाधव यांनी ‘प्रेमाची भाकरी’ नावाने कोल्हापुरात हॉटेल सुरू केले होते. शनिवारी रात्री हॉटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे.

कल्याणी जाधव या मूळच्या कोल्हापूरच्या असून सध्या महावीर कॉलेज परिसरात वास्तव्यास होत्या. कोल्हापूर सांगली महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे काही दिवसांपूर्वीच शेतकरी संघटनेकडून या मार्गावर आंदोलन करण्यात आले होते. मात्र आता याच रस्त्यावर डंपरच्या धडकेमुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने महामार्ग दुरुस्त करण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here