औरंगाबाद: औरंगाबादमध्ये कडक लॉकडाऊन केल्यानंतरही जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यात आज पुन्हा ८४ रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या १० हजारावर गेली आहे. औरंगाबादमधील ही संख्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवणारी ठरत आहे.

आज सकाळी जिल्ह्यात ८४ रुग्ण आढळून आले. तर, शहराच्या प्रवेश पॉईंटवर अँटीजन चाचणीत पाच पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या १० हजार १६६ झाली आहे. औरंगाबादमध्ये आतापर्यंत ५ हजार ८६१ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३८७ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच शहरात ३ हजार ९१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस आहे. आज मध्यरात्रीपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येणार असल्याने शहरातील व्यवहार उद्यापासून काही प्रमाणात सुरू होणार आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात नियमभंग केल्याप्रकरणी ४४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

दरम्यान, उद्यापासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता करण्यात येणार असली तरी प्रशासनाने नागरिकांना काही सूचना केल्या आहेत. व्यवहार सुरु करताना शहरातील सगळे व्यापारी, भाजी व फळ विक्रेते यांना अँटीजेन टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. ही टेस्ट न करता कुणी व्यापार सुरू केला तर त्याच्यावर एफआयआर दाखल केला जाईल असा इशारा महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिला. आज दुपारी दोन वाजेपासून अँटीजेन टेस्टसाठी शिबीरांचे आयोजन केले जाणार आहे.

दरम्यान, गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी तसेच ग्राहकांना खरेदीसाठी मुबलक वेळ मिळावा, यासाठी सर्व मार्केट रात्री ८ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात यावी, मुख्य बाजारपेठेत एकाच ठिकाणी उभे राहणारे हातगाडीवाले, फेरीवाले यांना काही काळ प्रतिबंध करावा, अन्यथा त्यांची एखाद्या मोकळ्या जागी व्यवस्था करावी, वन वे नियमाचे अंमलबजावणी काटेकोरपणे करा, यासह अन्य मागण्या महापालिका प्रशासकांकडे करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जग्गनाथ काळे यांनी दिली. व्यापाऱ्यांसाठी महापालिकेच्या माध्यमातून तपासणी शिबिराचे आयोजन ही करण्यात आल्याचे त्यांनी केले नमूद.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here