Maharashtra Political Crisis | माझे वडील शिंदे गटात गेले असले तरी मी कुठेही गेलेलो नाही. गेली अनेक वर्षे मी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करत आहे. माझ्या वडिलांनी वेगळा निर्णय घेतला असला तरी तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मीदेखील त्यांना माझा निर्णय त्यांना सांगितला आहे. तसेच मी शिवसेनेतच (ठाकरे गट) राहणार असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही कळवले असल्याचे अमोल कीर्तिकर यांनी सांगितले.

 

Amol kirtikar
अमोल कीर्तिकर राऊतांच्या भेटीला

हायलाइट्स:

  • अमोल कीर्तिकर यांनी रविवारी संजय राऊत यांची भेट घेतली
  • अमोल कीर्तिकर हे संजय राऊतांच्या बाजूला ठामपणे उभे होते
मुंबई: बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले शिवसेनेचे जुन्या फळीतील प्रमुख नेते गजानन कीर्तिकर यांनी शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कीर्तिकर गेल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. मात्र, कीर्तिकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला काही तास उलटत नाही तोच त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर संजय राऊत यांना जाऊन भेटला आहे. अमोल कीर्तिकर यांनी रविवारी संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हादेखील अमोल कीर्तिकर हे संजय राऊतांच्या बाजूला ठामपणे उभे होते. यामधून त्यांनी आता आपली पुढील वाटचाल ही ठाकरे गटासोबतच असेल, असा संदेश दिला आहे.

संजय राऊत यांनीही अमोल कीर्तिकर यांच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले. मला १०० दिवसांनी जेलमधून सुटल्यानंतर जितका आनंद झाला नसेल तितका आनंद आज अमोल भेटायला आल्यामुळे झाला. अमोल हा पक्षाबरोबरच आहे. त्याने गजाभाऊंना समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. पण अमोल आमच्यासोबत आहे, याचा मला खूप आनंद असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
Gajanan Kirtikar: बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ डाव यशस्वी होऊन दिला नाही; किर्तीकरांचा खळबळजनक दावा

मी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्त्वाखाली काम करेन: अमोल कीर्तिकर

माझे वडील शिंदे गटात गेले असले तरी मी कुठेही गेलेलो नाही. गेली अनेक वर्षे मी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करत आहे. माझ्या वडिलांनी वेगळा निर्णय घेतला असला तरी तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मीदेखील त्यांना माझा निर्णय त्यांना सांगितला आहे. तसेच मी शिवसेनेतच (ठाकरे गट) राहणार असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही कळवले असल्याचे अमोल कीर्तिकर यांनी सांगितले. गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत मला काही बोलायचे नाही. कारण माझ्या जन्माच्या आधीपासून गजानन कीर्तिकर यांची राजकीय कारकीर्द सुरु आहे. त्यामुळे मी त्यावर टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही. मी आता शिवसेना (ठाकरे गट) वाढवण्यासाठी काम करणार असल्याचे अमोल कीर्तिकर यांनी म्हटले.
Sanjay Raut: शिंदे गटात जाताच गजानन किर्तीकरांची भाषा बदलली; राऊतांकडून आक्रमक भाषेत समाचार
राजकारणातील वाद घरापर्यंत येऊ नये, असे आमचे मत आहे. गजानन कीर्तिकर यांनी त्यांच्या वैयक्तिक गोष्टींसाठी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. या सगळ्याचा आमच्या कौटुंबिक संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. पण मी माझ्या वडिलांच्या निर्णयाशी असहमत आहे, म्हणूनच मी आदित्य ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे अमोल कीर्तिकर यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here