प्रेमाची खरी परीक्षा वाईट दिवसांमध्ये होते असं म्हणतात. पण कधी कधी चांगल्या दिवसांमध्येही प्रेमाची परीक्षा होते. एखाद्या व्यक्तीचे अच्छे दिन येतात, तेव्हा ते वाईट दिवसात साथ देणाऱ्या व्यक्तीसोबत कशी वागते, त्यावरून तिचं चारित्र्य ठरतं. जर्मनीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत असाच काहीसा प्रकार घडला. ४२ वर्षांच्या कुर्सत यिलडिरिम रातोरात कोट्यधीश झाला. त्याला तब्बल ८५ कोटींची लॉटरी लागली. मात्र त्यानंतर त्याच्या स्वभावात अचानक बदल झाला.

तब्बल ८५ कोटी रुपयांची लॉटरी लागल्यानंतर कुर्सतनं प्रेयसीशी ब्रेक अप केलं. आलिशान जगणं सुरू केलं. तो पार्ट्या करू लागला. वारेमाप खर्च करू लागला. एक महागडी कार खरेदी केली. त्याचं बदललेलं रुप पाहून प्रेयसीनं त्याला बरंच ऐकवलं. लॉटरी लागताच कुर्सतनं ब्रेक अप केल्याचं त्याच्या ५० वर्षीय प्रेयसीनं सांगितलं. यानंतर कुर्सतनं जवळपास ३ कोटी रुपयांची फेरारी कार विकत घेतली.
किडनी स्टोन काढण्यासाठी सर्जरी; ६ महिन्यांनंतर असह्य वेदना; रिपोर्ट पाहून होमगार्ड हादरला
पैसे मिळाल्यावर तो इतका बदलेल, याचा विचारही मी केला नव्हता. माझा माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत नसल्याचं कुर्सतच्या प्रेयसीनं सांगितलं. तो मला डार्लिंग म्हणायचा. नेहमी सोबत राहण्याच्या आणाभाका त्यानं घेतल्या होत्या. आम्ही फार पुढचा विचार केला होता. या नात्याकडे मी गांभीर्यानं पाहत होते. मात्र लॉटरी जिंकल्यावर तो प्रचंड बदलला, असं प्रेयसीनं सांगितलं.

मी तुला हवं ते देईन, असं तो कायम म्हणायचा. लॉटरीमध्ये ८५ कोटी ७६ लाख रुपये जिंकल्यावर त्यानं मला फोन केला. माझं तुझ्यावर कधी प्रेमच नव्हतं. पण माझी प्रेयसी बनून राहा. त्याबदल्यात मी तुला पैसे देईन, अशी विचित्र ऑफर कुर्सतनं प्रेयसीला दिली. माझी प्रेयसी माझ्यासाठी खास आहे. तिच्यात असलेली माणुसकी आणि तिच्या भावनांवर माझं प्रेम होतं. तिच्यावर नाही, असं कुर्सतनं सांगितलं.
अंगणात खेळत होता चिमुकला, हाताला मुंग्या चावल्यानं घरात पळाला; काही तासांत अनर्थ घडला
कुर्सतला आधी अमली पदार्थांचं व्यसन होतं. त्यानं अनेकदा चोऱ्या केल्या होत्या. त्यामुळे त्याला २७ महिन्यांचा तुरुंगवास घडला. त्यानंतर तो क्रेन ऑपरेटर म्हणून काम करू लागला. या दरम्यान त्याला लॉटरी लागली. यानंतर त्यानं नोकरी सोडली. जवळपास ३ कोटी मोजून एक फेरारी कार खरेदी केली. या दरम्यान त्यानं प्रेयसीला सोडून दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here