थिरुअनंतपुरम: केरळमधील एका लग्नात तुफान राडा झाला आहे. लग्न लागल्यानंतर रिसेप्शन सुरू असताना दोन गट भिडले. त्यात ३० हून अधिक जण जखमी झाले. यात वधूच्या वडिलांचा समावेश आहे. थिरुअनंतपुरममधील बलरामपुरम येथे ही घटना घडली. शनिवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायल व्हिडीओमध्ये महिला आणि ज्येष्ठ व्यक्ती दिसत आहेत. हॉलमधील खुर्च्या अस्ताव्यस्त पडल्या आहेत. काही जण भांडणाऱ्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक पोलीस कर्मचारी हॉलमध्ये उपस्थित आहे. मात्र गोंधळापुढे तो हतबल ठरला आहे. दोन गटात झालेल्या वादात, हाणामारीत ३० पेक्षा अधिक जण जखमी झाले. त्यांना थिरुअनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालय आणि नेय्यात्तिनकारा तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
लग्न सोहळ्यात स्टेजवर मनसोक्त नाचला, एकाएकी कोसळला; अवघ्या काही मिनिटांत होत्याचं नव्हतं
रिसेप्शन सोहळा सुरू असताना वधूचा शेजारी राहणारा तरुण त्याच्या कुटुंबासह हॉलमध्ये आला. त्यांना या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. या तरुणानं आधी एकदा वधूच्या भावावर हल्ला केला होता. त्या प्रकरणात त्याला अटक झाली होती. त्यामुळे या तरुणाला आणि त्याच्या कुटुंबाला वधूकडून निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं.

निमंत्रण नसताना तरुण लग्नाला आला. काही वेळानं तो स्टेजवर गेला. त्यानं कुटुंबाला रोख रकमेच्या स्वरुपात गिफ्ट देऊ केलं. वधूच्या कुटुंबानं ते स्वीकारण्यास नकार दिला. यावरुन वधूचं कुटुंब आणि तरुणामध्ये वाद झाला. थोड्याच वेळात वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. तरुणाचे मित्रदेखील तिथे पोहोचले आणि हॉलमध्ये तुफान राडा झाला.
किडनी स्टोन काढण्यासाठी सर्जरी; ६ महिन्यांनंतर असह्य वेदना; रिपोर्ट पाहून होमगार्ड हादरला
हाणामारी सुरू असताना वधूचे वडील जमिनीवर कोसळले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. पोलीस पथक दाखल झाल्यानंतर प्रकरण निवळलं. निमंत्रण नसताना रिसेप्शनला आलेला तरुण तिथून पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. यानंतर वधू आणि वराकडच्यांनी पुढील कार्यक्रम केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here