Crime News: पोस्टमन, फळ विक्रेते बनून मुंबई पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या एका फ्लॅटमध्ये चोरी झाली होती. तब्बल ४२.३८ लाख रुपयांचं सोनं चोरीला गेलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना उत्तर प्रदेशातून अटक केली.

 

mumbai police
मुंबई: पोस्टमन, फळ विक्रेते बनून मुंबई पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या एका फ्लॅटमध्ये चोरी झाली होती. तब्बल ४२.३८ लाख रुपयांचं सोनं चोरीला गेलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना उत्तर प्रदेशातून अटक केली.

डिसेंबर २०२१ मध्ये दहिसर पूर्वेतील एका व्यवसायिकाच्या घरात चोरी झाली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी १६७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेलं फुटेज तपासलं. आरोपीनं तब्बल ९७ सिम कार्ड वापरली होती. आरोपी सातत्यानं सिम कार्ड बदलत असल्यानं तपासाचा वेग मंदावत होता. पोलिसांनी आरोपी वापरत असलेले नंबर ट्रू कॉलरवर तपासले. तिथे त्यांना अलीबाबा नाव दिसलं. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाला मिशन अलीबाबा असं नाव दिलं.
तुझ्या भावाला ४ वर्षांपूर्वी मीच मारलं, घरात गाडलं! शेजाऱ्याचं ऐकून भावानं खड्डा खणला अन्…
पोलिसांनी सर्व ९७ सिम कार्ड्सचा तपशील गोळा केला. त्यांच्या आधारे आरोपीच्या लोकेशनचा शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपी उत्तर प्रदेशात असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली. अमरोहा आणि बिजनोरमध्ये तपास सुरू झाला. पोलिसांनी पोस्टमन आणि फळ विक्रेते होऊन तपास सुरू केला. दिल्ली आणि नोएडामध्ये पोलिसांनी मुक्काम केला.
मृत वडिलांना जिवंत करण्यासाठी बळी देण्याची तयारी; २ महिन्यांच्या बाळाचं अपहरण केलं अन् मग…
आरोपी ग्रेटर नोएडामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीनं मुंबई पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सलमान अन्सारी, हैदर अली सैफी आणि कुशल वर्मा अशी आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १८ लाख रुपयांचं सोनं जप्त केलं. याप्रकरणी पोलिसांनी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल केले आहेत.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here