मुंबई : कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने शुक्रवारी मुंबई विमानतळावर ३२ कोटी रुपयांचे तब्बल ६१ किलो सोनं जप्त केलं आहे. याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी सोने तस्करीच्या रॅकेटशी संबंधित काही लोकांची नावे पोलिसांना दिली आहेत. तपास यंत्रंणा त्या लोकांची माहिती काढत आहे, अशी माहिती कस्टमच्या वतीने न्यायालयात देण्यात आली आहे.
छत्रपतींना बदनाम करणारे चित्रपट निर्माण करणं हा षडयंत्राचा भाग | जितेंद्र आव्हाड