परभणी : परभणीमधील वसमत शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करत असताना एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीला मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घडलं असं की, वाढदिवस साजरा करत असताना एक तरुण या तरुणीजवळ आला आणि खाली ठेवलेला केक अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणीच्या तोंडाला लावला. त्यानंतर त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि अल्पवयीन मुलीचा हात पकडून “तू माझ्याशी बोलत का नाहीस”, असे म्हणत मुलीला मारहाण केली. ही घटना शहरातील वसमत रोडवर शिवशक्ती बिल्डिंग जवळ घडली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविष्कार लोखंडे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

परभणी शहरातील सारनाथ कॉलनी येथे राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी शहरातील शारदा महाविद्यालय येथे पदवीचे शिक्षण घेत आहे. सदरील मुलगी आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वसमत रोडवरील शिवशक्ती बिल्डिंग जवळ गेली होती. मागील काही दिवसांपासून तिच्या घराशेजारी राहणारा हा तरुण तिचा पाठलाग करत होता.

फायनलचा टर्निंग पॉइंट नेमका ठरला तरी काय, फक्त एका चेंडूमुळे पाकिस्तानने गमावला सामना
तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणीला देखील गाडीवर बसून केंद्रीय महाविद्यालयाजवळ घेऊन गेला आणि त्या ठिकाणी मुलीच्या मैत्रिणीला देखील मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर मुलीने आपल्या नातेवाईकांना सांगितले त्यानंतर मुलीने नवा मोंढा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्यावरुन आरोपी अविष्कार लोखंडे यांच्या विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पौळ करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

इंग्लंडने सामना जिंकताच रचला मोठा विक्रम, क्रिकेट विश्वात ही कामगिरी करणारा पहिला संघ ठरला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here