मेलबर्न: इंग्लंडला एकदिवसीय विश्वचषक मिळवून देणाऱ्या बेन स्टोक्सनं आता टी-२० विश्वचषक विजयात मोलाचं योगदान दिलं आहे. श्रीलंकेविरुद्ध अत्यंत जबाबदार खेळी साकारून संघाला उपांत्य फेरीत नेणाऱ्या स्टोक्सनं अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध नाबाद अर्धशतक झळकावत संघाला जेतेपद पटकावून दिलं. सामना पाकिस्तानच्या बाजूनं झुकला असताना स्टोक्सनं फटकेबाजी केली. त्यामुळे १३८ धावांचं आव्हान इंग्लंडनं १ षटक आणि पाच गडी राखून पार केलं.

मूळचा न्यूझीलंडचा असलेल्या बेन स्टोक्सनं पाकिस्तानविरुद्ध संयमी आणि आक्रमक खेळीचा सुंदर मिलाफ पेश केला. तीन फलंदाज बाद झाल्यावर त्यानं पडझड रोखली. त्यानंतर आवश्यक धावगती वाढताच फटकेबाजी करत सामना फिरवला. न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमध्ये जन्माला आलेला स्टोक्स २०११ पासून इंग्लंडसाठी खेळत आहे. वयाच्या १२ व्या वर्षी स्टोक्स इंग्लंडला स्थायिक झाला. रग्बी कोच असलेल्या वडिलांच्या नोकरीमुळे त्याला न्यूझीलंडला अलविदा करावा लागला.
न्यूझीलंडच्या पोरामुळे इंग्लंड चॅम्पियन; वडिलांनी नोकरी बदलली, पोरानं पाकची नौका बुडवली
बेन स्टोक्सच्या जन्माआधी त्याच्या कुटुंबासोबत एक भयानक प्रसंग घडला. याबद्दलचं वृत्त इंग्लंडमधील द सन या टॅबलॉईडनं २०१९ मध्ये दिलं होतं. बेन स्टोक्सचे वडील गेरार्ड स्टोक्स यांच्याशी विवाह करण्याआधी बेनची आई डेबचं लग्न रिचर्ड डन नावाच्या व्यक्तीशी झालं होतं. डेब यांना रिचर्ड यांच्याकडून दोन मुलं होती. १९८८ मध्ये रिचर्ड यांनी बेनचा सावत्र भाऊ एँड्र्यू आणि सावत्र बहिण ट्रेसीची गोळ्या झाडून हत्या केली. त्यावेळी एँड्र्यू चार, तर ट्रेसी आठ वर्षांची होती.

या घटनेनंतर डेब यांनी रग्बी कोच असलेल्या गेरार्ड स्टोक्स यांच्याशी लग्न केलं. बेनचा जन्म १९९१ मध्ये झाला. डेब आणि गेरार्ड यांची मैत्री असल्याचं समजल्यावर रिचर्ड संतापले. त्यांनी रागाच्या भरात दोन मुलांची हत्या केली. यानंतर त्यांनी आत्महत्या केली. बेन १२ वर्षांचा असताना गेरार्ड यांना इंग्लंडमधील रग्बी लीग क्लबमध्ये नोकरी मिळाली. त्यामुळे स्टोक्स कुटुंबानं न्यूझीलंड सोडलं आणि इंग्लंडमध्ये स्थायिक झाले.
चॅम्पियन इंग्लंडवर पैशांचा पाऊस; भारतही मालामाल, पाहा टीम इंडियाला किती बक्षीस मिळणार?
डेब आणि रिचर्ड यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर रिचर्ड यांना गेरार्ड आणि डेब यांच्या मैत्रीबद्दल समजलं. संतापाच्या भरात त्यांनी दोन मुलांना गोळ्या झाडून संपवलं. तणावात असलेल्या रिचर्ड यांनी एँड्र्यू आणि ट्रेसीचा खून केला. त्यावेळी रिचर्ड बेरोजगार होते. त्याआधी त्यांनी एकदा त्यांचं घर पेटवून दिलं होतं. या घटनेमुळे डेब यांच्या मनावर तीव्र आघात झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here