मुंबई : अंबरनाथमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधुंद गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अंबरनाथ एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.
पनवेलमधील पंढरी फडके आणि कल्याणचे राहुल पाटील ही दोन नावे बैलगाडा शर्यतीत नेहमीच चर्चेत राहिले आहेत. या दोन व्यक्तींमुळे संपूर्ण बैलगाडा शर्यतींना गालबोट लागण्याचा प्रकार याआधी देखील घडला होता. गेल्या वर्षीचा मोसमात या दोन्ही गटातील बैलगाडींना प्रवेश नाकारण्यात आला होता. हे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात जाण्याची शक्यता असल्यामुळे ही दक्षता बाळगण्यात आली होती.
सावत्र पित्यानं भाऊ-बहिणीवर झाडल्या होत्या गोळ्या; भयानक परिस्थितीतून गेलंय स्टोक्स कुटुंब मात्र, आता बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु झाल्याने हे दोन गट पुन्हा एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. बैलगाडा शर्यती संदर्भात बोलवण्यात आलेल्या बैठकीत फडके आणि राहुल पाटील गटात मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाले. त्यातूनच फडके गटाने पाटील गटावर अंदाधुंद गोळीबार केला. अंबरनाथच्या एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ गोळीबाराची ही घटना घडली. १५ ते २० गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही घटना कळताच राहुल पाटील यांचे शेकडो समर्थक घटनास्थळी पोहोचले आहेत.