अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्गावर काल शनिवारी रात्री स्फोट झाला. या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, रेल्वे ट्रॅक उखडण्याच्या प्रयत्नात प्रथमदर्शनी ब्लास्टिंग करण्यात आले असून घटनास्थळी स्फोटके सापडली आहेत. वास्तविक घटनास्थळाच्या आजूबाजूला खाणकाण देखील सुरु आहे. पोलीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला आहे. घटनास्थळाच्या दोन्ही बाजूंनी रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे या नव्या मार्गावर मोठी दुर्घटना टळली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सालूंबर मार्गावरील पुलावर शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. येथे काल रात्री १० वाजता गावकऱ्यांना स्फोटाचा आवाज आला. यानंतर काही तरुण तातडीने ट्रॅकवर पोहोचले. रेल्वे रुळावर स्फोटकं पडल्याचे त्यांनी सांगितले.

बीसीसीआय ॲक्शन मोडमध्ये; द्रविड, रोहित, विराटला बोलवणार; कोणाची विकेट पडणार?
अनेक ठिकाणी रुळ तुटले आहेत. पुलावरील लाइनमधून नट-बोल्टही गायब असल्याचे आढळून आले. रुळावर एक पातळ लोखंडी पत्राही निघालेला दिसून आला. या घटनेला दुजोरा देताना उदयपूरचे पोलीस अधीक्षक विकास शर्मा म्हणाले की, एफएसएल टीम घटनास्थळी आहे. तपासानंतरच नेमकी स्थिती स्पष्ट होईल. रेल्वेच्या अजमेर विभागाचे जनसंपर्क अधिकारी अशोक चौहान यांनी ही घटना घडल्याचे सांगितले. दरम्यान, याप्रकरणी तपास सुरु आहे. घटनास्थळाच्या दोन्ही बाजूला गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.

जैसे ज्याचे कर्म… मोहम्मद शमीने एका वाक्यात केली अख्तरची बोलती बंद, पाकिस्तानला मिर्ची झोंबली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here