जुन्नर (पुणे): आजची लहान मुले खूप ऍक्टिव असल्याचे आपण पाहतो. प्रत्येक गोष्ट लहान मुले मनापासून आणि शिवाय कमी वयात करून रेकॉर्ड बनवतात. जुन्नर तालुक्यातील वैशाखखेडे येथील आठ वर्षांच्या शौर्य किशोर काकडे याने एका अनोख्या कलेत रेकॉर्ड केला आहे. शौर्यने दीडशे फुटापर्यंत पत्ते फेकण्यात विक्रम केला आहे. तसेच तो तलवारबाजी, डबल लाठीकाठी असे वेगवेगळे खेळ खेळतो. विशेष म्हणजे त्याने या सर्वांचा सराव युट्यूबवर बघून केला आहे. त्याच्या या आगळ्यावेगळ्या कलांचे कौतुक होत आहे.

शौर्यची बहिण इशिता काकडे १५ वर्षांची असून तीदेखील अनेक कलांमध्ये तरबेज असून ती पारंपारिक शस्त्रे आणि घोडेस्वारीही तेवढ्याच आत्मविश्वासाने करते. ग्रामीण भागात अनेक खेळांबाबत असुविधा असल्याने ती सध्या पुण्यात रायफल शुटिंगची प्रॅक्टिस करते आहे. त्यामुळे हे दोघे बहीण भाऊ अनेकांचा आदर्श ठरत आहेत.
Pune : शेतकऱ्याच्या मुलीची अनोखी कला, वैष्णवी तरंगते पाण्यावर! पाहणारे होतात अवाक
शौर्य आणि इशिता हे दोघे बहिण भाऊ शेतकरी कुटुंबातील. वडील शेती करतात. आपल्याला काही शिकता किंवा कुठली कला जोपासता आली नाही म्हणून मुलांना काही तरी वेगळे घडवायचं अशी वडिलांची इच्छा. त्या मनातल्या इच्छाला मुलांच्या रूपाने सत्यात उतरवण्याचा प्रयत्न या मुलांचे वडील करत आहेत.

शौर्य हा कार्ड थ्रो या प्रकारात पारंगत असून तो जवळपास दीडशे फुटापर्यंत कार्ड फेकतो. त्याची या कौशल्याची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली. त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली. गावाकडे मुलांना इच्छा असूनही खेळ खेळता येत नाहीत. कारण तिथे सुविधा उपलब्ध नसतात. तसेच अनेकांची घरची परिस्थिती बेताचीच असल्याने शहरातला खर्च परवडत नाही. त्यामुळे क्षमता असूनही चांगले खेळाडू घडत नाहीत.

किशोर काकडे यांनी आपल्या मुलांना खेळत सहभागी होता यावे म्हणून त्यांना शहरात प्रॅक्टिससाठी घेऊन येतात. त्यांना खेळातली प्रत्येक गोष्ट समजावी यासाठी प्रामाणिकपणे कष्ट घेत आहेत. आज शौर्य आणि इशिका हे दोघेही कार्ड थ्रो आणि रायफल शूटिंगमध्ये नाव गाजवत आहेत. जुन्नरच्या या बहिण भावाच्या कामगिरीचे कौतुक करावे तितके कमी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here