मुंबई : महालक्ष्मी येथील धोबीघाट परिसरातून एक विचित्र घटना समोर आली. भीक मागणाऱ्या महिलेची बॅगचोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना तिच्या हत्येप्रकरणात तुरुंगात जावे लागले आहे. बॅग चोरी होईल म्हणून ही ज्येष्ठ महिला बॅगेचे पट्टे गळ्याभोवती गुंडाळून ती बॅग उशाखाली ठेवून झोपली होती. चोर ही बॅग खेचत असताना ही महिला वरुन खाली पडली आणि त्यात महिलेचा मृत्यू झाला.

मूळच्या वर्धा येथील शेतकरी असलेल्या शारदा वाघमारे (वय ६५) काही दिवसांपासून मुंबईत राहत होत्या. ठिकठिकाणी भीक मागून त्या पोट भरत होत्या. भीक मागून चांगली कमाई होत असल्याने शारदा पुन्हा गावी जात नव्हत्या. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे धोबी तलावजवळील एका कठड्यावर त्या झोपल्या होत्या. पहाटेच्या सुमारास एक महिला बेशुद्धावस्थेत पडली असल्याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. आग्रीपाडा पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बेशुद्धावस्थेतील महिलेला त्वरीत रुग्णालयात नेले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तिच्या बॅगमध्ये काही मोबाइल क्रमांक सापडले त्यावर पोलिसांनी संपर्क केल्यानंतर तिचे नाव शारदा वाघमारे असल्याचे स्पष्ट झाले. डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला असावा असे डॉक्टरांनी सांगितल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला.

संशय आला म्हणून पिकअप गाडी थांबवली; दार उघडून बघताच पोलिसही चक्रावले
आग्रीपाडा पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन तरुण शारदा यांच्या आजूबाजूस घुटमळत असल्याचे दिसले. आणखी फुटेज तपासले असता हे दोघे पळत असल्याचे दिसले. यांचे चेहरे स्पष्ट दिसल्यानंतर ते परिसरात दाखवण्यात आले. त्यावेळेस शुभम चौबे आणि त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलास येथील नागरिकांनी ओळखले. या घटनेनंतर पसार झालेल्या दोघांना आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली. शारदा यांनी उशाखाली ठेवलेली बॅग या दोघांनी खेचली. मात्र, बॅगेचे पट्टे शारदा यांच्या गळ्यात असल्याने त्या कठड्यावरून खाली पडल्या आणि दगडावर आपटल्या, असे दोघांनी सांगितले. शारदा भीक मागून खूप कमाई करायच्या आणि पैसे बॅगेत ठेवायच्या हे माहीत असल्यानेच ते चोरण्याचे ठरवले, असे शुभम आणि त्याच्या साथीदाराने सांगितले.

यांची बातच न्यारी! १५० फुटांवर पत्ते फेकणारा भाऊ गिनीज बुकात; बहिण पारंपारिक खेळात हुश्शार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here