UP News : देशात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना एका भयंकर प्रकाराने सगळेच हादरले आहेत. एका १९ वर्षीय तरुणीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली आहे. या घटनेच्या तपासामध्ये असं काही सत्य समोर आलं की पोलीसांनाही मोठा धक्का बसला आहे. यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी आणि पीडित तरुणी एकमेकांना आधीपासूनच ओळख होते. घटनेच्या दिवशी ती घरात एकटीच होती. याचा फायदा घेत आरोपी घरी आला आणि त्याने तिच्याशी बळजबरीने संबंध ठेवले.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी आरोपीने उत्तेजनवर्धक गोळ्यांचे सेवन केले होते. त्यामुळे वारंवार शारीरिक संबंध निर्माण करण्यासाठी मुलीने त्याला विरोध केला. परंतु तरुण तिच्याशी बळजबरीने संभोग करू लागला. यामध्ये पीडित तरुणी बेशु्द्ध झाली आणि तिच्या गुप्तांगातून रक्तप्रवाह सुरू झाला. हे सगळं पाहून आरोपी घाबरला आणि घटनास्थळावरून पळून गेला.

कोल्हापुरात खळबळ! २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, तपासात धक्कादायक कारण समोर…
पोलीस अधीक्षक (एसपी) सिद्धार्थ शंकर मीना यांनी सांगितले की, १० नोव्हेंबर रोजी कोतवाली सदर भागातील हुसेननगर गावात एका दलित मुलीचा मृतदेह तिच्या घरात आढळून आला होता. या प्रकरणी यापूर्वी सुजित आणि कुंवरा नावाच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अखेर उलगडलं रहस्य…

या प्रकरणाच्या चौकशीत पोलीस ठाणे कोतवाली आणि एसओजीच्या निगराणीने तरुणीचे व्हॉट्सअॅप चॅट आणि सीडीआर शोधून मुलीचा प्रियकर रामबरन उर्फ राज गौतम मुलगा जुग्गी लाल याला अटक केली.

Jayant Patil : जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; काहीही झालं तरी…
रक्तस्रावाने मृत्यू…

पोलीस चौकशीत आरोपी प्रियकराने सांगितले की, तो शेअर चॅट अॅपच्या माध्यमातून तरुणीशी बोलत असे. बोलूनच तो तिच्या घरी भेटायला गेला. पोटेंसी औषधाचा ओव्हरडोज घेऊन त्याने प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवले. यामुळे मुलगी बेशुद्ध झाली आणि तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. या भीतीने तो तिला तशाच अवस्थेत सोडून पळून गेला. अतिरक्तस्रावामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचं तापासात समोर आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here