Maharashtra Politics | मुंब्रा मतदारसंघातील जनतेने जितेंद्र आव्हाड यांना निवडून दिले आहे. ते एक चांगले लोकप्रतिनिधी आहेत. जितेंद्र आव्हाड एक संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यांच्या मनाला प्रचंड वेदना होत आहेत, हे मान्य आहे. पण त्यावर आमदारकीचा राजीनामा देणे, हा उपाय नाही, असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी आव्हाडांना दिला. आम्हीदेखील एखाद्या कार्यक्रमाला जातो तेव्हा थोडफारं जॉसलिंग होतं

 

हायलाइट्स:

  • आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा विचार मनातून काढून टाकावा
  • आव्हाड एक चांगले लोकप्रतिनिधी आहेत
पुणे: जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातील व्हिडिओ स्वत: तीन-चारवेळा पाहिला. हा प्रकार घडला तेव्हा आजुबाजूला प्रचंड गर्दी आणि पोलीस यंत्रणा होती. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यावेळी गर्दीत असताना श्रीकांत शिंदे यांनाही हात लावला होता. त्यानंतर संबंधित महिलेला बाजूला केले. त्या गदारोळात नक्की काय झालं, हे समजलं नाही. पण यामध्ये महिलेचा विनयभंग कसा होऊ शकतो? हा प्रकार गैरसमजातून झाला आहे. संबंधित महिलेची बाजू नक्की ऐकून घेतली पाहिजे. पण जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखलं करण्याचे टोकाचं पाऊल उचलणे, हे अयोग्य असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. त्या सोमवारी पुण्यात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.
Jitendra Awhad: महिला मुख्यमंत्री शिंदेंना भेटली, अन सारी चक्रं फिरली; जितेंद्र आव्हाडांचा आरोप
यावेळी सुप्रिया सुळे यांनी जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा विचार मनातून काढून टाकावा, असे सांगितले. मुंब्रा मतदारसंघातील जनतेने जितेंद्र आव्हाड यांना निवडून दिले आहे. ते एक चांगले लोकप्रतिनिधी आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा विचार मनातून काढून टाकावा, असे सांगितले. मुंब्रा मतदारसंघातील जनतेने जितेंद्र आव्हाड यांना निवडून दिले आहे. ते एक चांगले लोकप्रतिनिधी आहेत. जितेंद्र आव्हाड एक संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यांच्या मनाला प्रचंड वेदना होत आहेत, हे मान्य आहे. पण त्यावर आमदारकीचा राजीनामा देणे, हा उपाय नाही, असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी आव्हाडांना दिला.
Jitendra Awhad: अत्यंत नीच दर्जाचं राजकारण; आव्हाडांनी विनयभंगासारखी कृती केलेली नाही: अंजली दमानिया

गर्दीत धक्का लागणे म्हणजे विनयभंग ठरत नाही: सुप्रिया सुळे

यावेळी सुप्रिया सुळे यांनी आपले काही अनुभव सांगितले. आम्हीदेखील एखाद्या कार्यक्रमाला जातो तेव्हा थोडफारं जॉसलिंग होतं. मी भारत जोडो यात्रेसाठी गेले होते, तेव्हाही असा प्रकार घडला. तेव्हा अनेक मुलं माझा हात ओढत होती. मी आता त्याला विनयभंग म्हणायचा का? ते लोकांचे आपल्यावर असलेले प्रेम असते. महाराष्ट्रात लोकं बंदुकी घेऊन महिलांना शिव्या घालतात. तेव्हा आम्ही विनयभंगाच्या केसेस घालत नाही. हा आपला मार्ग नाही, हे लक्षात ठेवून, व्यावसायिकपणे वागत आम्ही दुसऱ्या मार्गाने जातो. मी मध्यमवर्गीय आणि सुसंस्कृत कुटुंबात वाढले आहे. माझ्या आईने मला, एक गोष्ट शिकवली आहे की, गर्दीमध्ये गेलीस आणि धक्का खायची वेळ आली तर बाजूला उभी राहा, दोन मिनिटं उशीर झाला तरी चालेल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here