लंडन: भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी लवकरच इंग्लिश प्रीमियर लीगचा दिग्गज फुटबॉल संघ विकत घेऊ शकतात. द मिररच्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी लिव्हरपूल फुटबॉल क्लब विकत घेण्याच्या शर्यतीत सामील झाले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (RIL) अध्यक्ष आणि आयपीएल संघाचे मालक मुंबई इंडियन्स आता क्रीडा क्षेत्रात आपला दबदबा वाढवण्याच्या तयारीत आहेत आणि लवकरच फुटबॉल क्लब लिव्हरपूल (Liverpool) आपल्या पदरात पडण्याच्या तयारीत आहेत.

लिव्हरपूलला मिळणार नवा मालक
अहवालानुसार, लिव्हरपूल एफसीची मालकी असलेल्या फेनवे स्पोर्ट्स ग्रुपने (FSG) क्लब विकण्याची तयारी सुरू केली आहे. FSG ने लिव्हरपूल एफसी विकण्यासाठी ४ अब्ज पौंड म्हणजेच सुमारे ३८ हजार कोटी रुपयांची किंमत निश्चित केली आहे. म्हणजेच फुटबॉल क्लब खरेदी करण्यासाठी अंबानींना हजार कोटींची रक्कम मोजावी लागणार आहे. मुकेश अंबानींनी लिव्हरपूल क्लब विकत घेण्यास स्वारस्य दाखवल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

पहिले व्हिला…आता हवेली; ६ महिन्यात अंबानींनी दुबईत घेतलं दुसरं घर, दशलक्ष डॉलर्समध्ये झाला सौदा
अंबानींना खेळात रस
भारतासह आशियातील दुसरे श्रीमंत अंबानी यांची एकूण संपत्ती ७.६ लाख कोटी रुपये आहे आणि त्यांना खेळातही खूप रस असल्याचे सर्वांना माहित असेलच. त्यामुळे ते प्रसिद्ध फुटबॉल क्लब विकत घेण्यासाठी मोठी रक्कम सहज देऊ शकतात. इंग्लंडचा लोकप्रिय फुटबॉल संघ लिव्हरपूल ताब्यात घेण्यासाठी अंबानींना मध्य पूर्व आणि अमेरिकेतील इतर गुंतवणूकदारांना मागे टाकावे लागेल, असे सांगितले जात आहे. पण जर मुकेश अंबानींनी हा करार पूर्ण केला तर ती मोठी उपलब्धी ठरेल आणि इंग्लंडमध्ये भारताचा डंका वाजेल.

आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलांवर होऊ नये म्हणून Nita Ambani यांनी पाळल्या ‘या’ गोष्टी, मुलांवर करा असे संस्कार

क्रीडाप्रेमी मुकेश अंबानी
मुकेश अंबानी हे मोठे क्रीडाप्रेमी असल्याचे सांगितले जाते आणि यापूर्वीच आयपीएलचा मुंबई इंडियन्स संघ रिलायन्स ग्रुपचा आहे. अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजकडे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संघ मुंबई इंडियन्सची मालकी आहे आणि अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनसह फुटबॉल लीग, इंडियन सुपर लीग चालवते. गेल्या काही वर्षांमध्ये RIL, जेएसडब्ल्यू सारख्या इतर कॉर्पोरेट्ससह, हीरो मोटोकॉर्प आणि अदानी समूह देखील फुटबॉलमध्ये गुंतवणूक करण्यासाठी टाटांच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. टाटा समूह गेल्या ३५ वर्षांपासून जमशेदपूरमध्ये टाटा फुटबॉल अकादमी ही एलिट फुटबॉल अकादमी चालवत आहे.

धीरुभाई अंबानी स्कूलच्या मालकीण Nita Ambani कितवी शिकल्या? ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य
फुटबॉल आणि क्रिकेट व्यतिरिक्त, RIL ने भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आणि ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाशी अनेक स्पर्धांमध्ये खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी करार केला आहे. यामध्ये कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिकचा समावेश आहे. असोसिएशनचा एक भाग म्हणून रिलायन्स २०२४ मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिले-वहिले इंडिया हाऊस देखील उभारणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here