रविवारी स्वारगेट डेपोची बस क्रमांक ७९९ डीआर २५५० ही सुसाट वेगाने पुणे स्टेशन परिसरात आली. बसच्या जवळून दुचाकीवरुन दोन तरुण जात होते. यावेळी तरुणांनी रागात आपली बाईक बसच्या पुढे लावली. त्यामुळे चालकाने त्यांना हटकलं. यानंतर दोघांमध्ये एकमेकांच्या चुका सांगत बाचाबाची झाली. या भांडणाचं रुपांतर हाणामारीत झालं. अशात तरुणांनी थेट PMPL बस चालकाची कॉलर पकडून चपलांनी मारण्यास सुरुवात केली.
दरम्यान, बसच्या चालकाला मारताहेत हे पाहून बसचा वाहक देखील दुसऱ्या तरुणावर तुटून पडला. ही तुफान हाणामारी प्रवाशांनी मोबाईल कॅमेऱ्यात शूट केली. इतक्यात काही उपस्थित नागरिकांनी ही भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते दोघे तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे या प्रकरणी मारहाण करणाऱ्या दोन तरुणांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात PMPL प्रशासनाने गुन्हा दाखल केला असून तरुणांना अटक करण्यात आली आहे.
कोणी टॉम बॉय, तर कोणी गोलू-मोलू; बॉलिवूडचे बोल्ड स्टार्स लहानपणी कसे दिसायचे