वाराणसी: उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एका नेपाळी नागरिकाचे जबरदस्तीने मुंडन केल्याची घटना घडली आहे. मुंडण केल्यानंतर त्याला ‘’ असा जयजयकार करण्यास भाग पाडण्यात आले. वाराणसीमध्ये, एका हिंदुत्ववादी विचारसरणीच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले आहे. हे कार्यकर्ते इतक्यावरच न थांबता त्यांनी नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली

या घटनेमुळे शेजारच्या देशाशी असलेले भारताचे संबंध अधिक तणावपूर्ण बनवू शकतात असे म्हटले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ या संघटनेच्या नेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. भगवान राम यांचा जन्म नेपाळमध्ये झाला होता आणि खरी अयोध्या काठमांडूजवळ होती असा दावा पंतप्रधान ओली यांनी केला होता. त्या वक्तव्याचा निषेध या संघटनेने केला आहे.

या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून दुसर्‍याची ओळख पटली आहे अशी माहिती वाराणसी पोलिसांनी दिली. आम्ही या प्रकरणात कठोर कारवाई करू असेही पोलिस. या घटनेतील आरोपींपैकी एकाचे नाव अरुण पाठक असून तो विश्व हिंदू सेनेचा निमंत्रक आहे. पाठक यानेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत इतरही कार्यकर्ते दिसत आहेत.

वाचा:

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर नेपाळचे राजदूत निलंबर आचार्य यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी याप्रकराणाबाबत चर्चा केली. त्यावेळी योगी यांनी निलंबर आचार्य यांना या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

अयोध्या हे एक प्राचीन शहर असून कोट्यवधी हिंदू ही भूमी भगवान राम यांची जन्मभूमी असल्याचे मानतात. मात्र प्रत्यक्षात खरी अयोध्या ही काठमांडूजवळील एका लहान गाव आहे, असे नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते.

वाचा:

आम्हाला अजूनही विश्वास आहे की आम्ही सीता राजकुमार राम यांना दिली, परंतु आम्ही नेपाळमध्ये असलेल्या अयोध्येतील राजपुत्र राम यांना सीता दिली होती, भारतातील अयोध्येतील रामाला नव्हे, असे पंतप्रधान ओली म्हणाले होते. अयोध्या हे बिरंगज मधील एक लहान गाव आहे, असेही ओली म्हणाले होते. (बीरगंज हा नेपाळमधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा राजधानी काठमांडूपासून १३५ किमी अंतरावर आहे)

वाचा:
आमच्यावर सांस्कृतिक दडपशाही झाली असून तथ्यांना बदलण्यात आले आहे, असा आरोपही पंतप्रधान ओली यांनी केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here