डोंबिवली : शिवसेनेतील फुटीनंतर डोंबिवलीच्या मध्यवर्ती शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. यानंतर शिंदे गटाकडून ही शाखा कायदेशीररित्या आपल्या ताब्यात घेण्यात आली. शाखेचा वाद सुरू झाल्यापासून या भागातील खासदार श्रीकांत शिंदे यांनी इथे आले नव्हते. मात्र काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध कामाच्या भूमीपूजनासाठी डोंबिवलीत आले असता ते या मध्यवर्ती शाखेत आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते. बऱ्याच दिवसानंतर या शाखेत आल्याने श्रीकांत शिंदे हे काहीसे भावुक झाल्याचं पाहायला मिळाले.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी तब्बल सात ते आठ महिन्यांनंतर डोंबिवलीच्या मध्यवर्ती शाखेत प्रवेश केला. ते शाखेच्या पायरीवर नतमस्तक झाले. यावेळी श्रीकांत शिंदे यांना अश्रू अनावर झाले. याबाबतचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Jitendra Awhad: निर्दोषत्व सिद्ध करता येत नसल्याने जितेंद्र आव्हाड वेडेचाळे करतायेत: आशिष शेलार

शाखेवरून नेमकं काय घडलं होतं?

एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत आमदार-खासदारांसह बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. या फुटीचा परिणाम स्थानिक पातळीवरही झाला. डोंबिवलीची मध्यवर्ती शाखा नेमकी कोणाची? यावरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद उफाळला. वादानंतर सुरुवातीला या शाखेचे सामंजस्याने दोन भाग करण्यात आले. मात्र त्यानंतर पुन्हा हा वाद पेटला. शाखा आमचीच असा दावा बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाकडून करण्यात आला. १४ ऑक्टोबर रोजी या शाखेचे अधिकृत रजिस्टेशन केल्याची माहिती यावेळी दिली गेली. त्यानंतर, अखेर शिंदे गटाकडून कायदेशीररित्या ही शाखा अखेर ताब्यात घेण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here