मे महिन्यात लिस्टिंग झाल्यापासून कंपनीच्या शेअर्समधील ही एक दिवसाची सर्वात मोठी तेजी आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात अनेक पटींनी वाढ झाली आहे. त्यामुळे एलआयसीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा रु. १५,९५२ कोटी होता, जो मागील वर्षी याच तिमाहीत रु. १,४३४ कोटी होता. ब्रोकरेज हाऊसने LIC शेअर्सवर खरेदीचे (Buy) रेटिंग रु. ९१७ च्या टार्गेट प्राईससह कायम ठेवले आहे.
प्रीमियम उत्पन्न आणि लेखा धोरणातील बदलाचा कंपनीला चांगला फायदा झाला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या मते, कंपनीचा शेअर ९१७ रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी आता प्रतीक्षा करावी. तज्ज्ञांनुसार, ७०० रुपयांवर पोहोचल्यानंतर त्यात जोरदार वाढ दिसून येईल. एलआयसी शेअरच्या किमतीने सुरुवातीच्या सत्रात चार्ट पॅटर्नवर ट्रेंड रिव्हर्सल दिला आहे. नजीकच्या काळात तो ७०० ते ७२० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तर नवीन गुंतवणूकदार ६३० रुपयाच्या स्टॉप लॉससह अल्प मुदतीसाठी खरेदी करू शकतात.
लिस्टिंगवर घसरण
गुंतवणूकदारांनीं लक्षात घ्या की LIC चा स्टॉक यावर्षी १७ मे रोजी स्टॉक एक्स्चेंजमध्ये ८६७ रुपयांवर सूचिबद्ध झाला होता आणि ९४९ रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत आठ टक्के सूट दिली होती. तेव्हापासून स्टॉकमध्ये लक्षणीय घट झाली. त्याची ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत ५८८ रुपये आहे, जी स्टॉकने २१ ऑक्टोबर रोजी गाठली. सध्या कंपनीचे मार्केट कॅप ४,१७,७३४.४७ कोटी रुपये आहे. सकाळी ११ वाजता कंपनीचा शेअर बीएसईवर ५.३३ टक्क्यांच्या वाढीसह ६६१.५० रुपयांवर व्यवहार करत होता.
एलआयसीचे शेअर्स मे २०२२ मध्ये एक्सचेंजेसवर त्याच्या IPO नंतर ९९४ रुपये प्रति शेअर सूचीबद्ध झाले होते. पण सूचीबद्ध झाल्यापासून, त्याची किंमत सुमारे ३५ टक्क्यांनी घसरली आणि २९ ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूकदारांचे सुमारे २.२३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.