पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश वाडकर याची जनता वसाहतीमध्ये दहशत होती. एका भांडणामध्ये त्याचा गुंड चॉकलेट सुन्या व त्याच्या साथीदारांनी निलेशची हत्या केली होती. त्यानंतर त्याचा मुलगा नवनाथ वाडकर हा गुंड बनून परिसरात दहशत पसरवत आहे. आता वाडकर याच्या पत्नीवर हा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना आंबेगावातील स्वामी नारायण मंदिर येथील चौपाटीवरील हॉटेल समोर ते कात्रज जुना बोगद्याकडे जाणाऱ्या रोडवर शनिवारी सायंकाळी साडे सहा ते रात्री दहा वाजेच्या दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंड निलेश वाडकर याच्या बायकोने फिर्यादीसोबत व्हॉटसअॅप चॅटींग करुन त्यांना स्वामी नारायण मंदिराजवळ बोलावून घेतले. त्यानंतर पूनम तिच्या साथीदारासोबत तिथे आली असताना फिर्यादीला त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन हत्याराचा धाक दाखवला. त्यानंतर जबरदस्तीने गाडीवर बसवून मुंबई बँगलोर महामार्गाने निलेश वाडकर याच्या बायकोच्या साथीदारांनी “तु पुनमला लॉजवर घेऊन जाणार का? तुला बायकांना फसवायला पाहिजे”, असे म्हणत धारधार हत्याराने फिर्यादीच्या डोक्यात जोरदार मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांना संपवून टाकण्याची धमकी देखील दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कर्चे तपास करीत आहेत.