नाशिक : नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकच्या सिन्नरमध्ये एका सर्पमित्राने पत्नीच्या त्रासाला कंटाळून पकडलेल्या कोब्रा जातीच्या नागाबरोबर स्टंट करत आपले जीवन संपवले आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यात असलेल्या सिन्नर शहरातील एका महाविद्यालय परिसरात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सर्पमित्र नागेश श्रीधर भालेराव याने पकडलेल्या कोब्रा जातीच्या सापासोबत स्टंट केला. यावेळी सापाने त्याच्या ओठांना दंश केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून पत्नी सोबत पटत नसल्याने कौटुंबिक वाद होत होते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी नागेशने एक व्हिडिओ क्लिप बनवत जीवाचे बरे वाईट करेल असे म्हटले होते. यानंतर त्याने पकडलेल्या कोब्रा सापासोबत स्टंट करताना चुंबन घेताना सापाने त्याला दंश केला यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ एकच उडाली आहे.

काही दिवसांपासून पत्नी सोबत वाद झाल्याने तो घराबाहेर राहत होता. दोघांचा वाद एवढा टोकाला गेला होता की नागेश ने दोन दिवसांपूर्वी स्वतःची व्हिडिओ क्लिप बनवत पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याचे त्याने म्हटले होते. पत्नीकडून त्याला वेळोवेळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील देण्यात येत असल्याने तो कंटाळून घर सोडून गेल्याचे त्याने व्हिडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. नागेश हा गेल्या काही वर्षांपासून सर्प पकडण्याचे काम करत होता तो परिसरात सर्पमित्र म्हणून परिचित झाला होता. सिन्नर शहरातील वेल्डिंग वर्कशॉप सह होर्डिंग चिटकवण्याचे काम करून नागेश कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. नागेशने तयार केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये स्टॅम्प पेपरवर विवाहात फसवणूक झाल्याचा उल्लेख केला आहे. पत्नीकडून नागेश व त्याच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास होत असल्याचे त्याने स्टॅम्प पेपर वर नमूद केले होते.

Ajit Pawar: आव्हाडांपासून मुख्यमंत्री पाच-दहा फुटांवरच, विनयभंग झाला नाही, हे त्यांनीच सांगायला हवं: अजित पवार
दरम्यान, नागेश ने काही दिवसांपूर्वी पकडलेल्या कोब्रा सापाला सिन्नर महाविद्यालयाच्या समोरील कॅफेत आणले या कॅफेवरील बिल्डिंगच्या गच्चीवर जात नागेशने नागासोबत स्टंटबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी नागेशने कोब्रा सापाला चुंबन घेण्याचा प्रयत्न केला व यातच सापाने नागेशच्या ओठांना एकदा व गालावर दोनदा दंश केला यात नागेशला त्याचा जीव गमवावा लागला. याबद्दलची माहिती नागेशच्या मित्रांना कळताच त्यांनी नागेशला दवाखान्यात दाखल केले परंतु उपचाराअगोदरच नागेशने त्याचे प्राण गमावले होते. या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा पसरली असून नागेशने जीवाचे बरे वाईट करेल असे व्हिडिओ क्लिप बनवल्यानंतर दोन दिवसांनी त्याचा जीव गेला आहे. त्यामुळे परिसारत एकच खळबळ उडाली आहे.

भारतीय क्रिकेटपटूची प्रकृती बिघडली; मॅच सुरू होण्याआधी दाखल केलं रुग्णालयात, पाहा झालं तरी काय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here