नवी दिल्ली : या वर्षी ऑगस्ट महिन्यात दिल्लीच्या तिहार तुरुंगातून एक विचित्रसे प्रकरण उघड झाले. या तुरुंगात उच्च सुरक्षेत बंदिस्त असलेल्या एका कैद्याच्या पोटात ५ मोबाईल फोन असल्याचे आढळून आले होते. यानंतर डॉक्टरांनी त्याच्या पोटातून दोन मोबाईल काढले होते. मात्र अजूनही कैद्याच्या पोटात दोन मोबाईल अडकून आहेत. हे अडकलेले मोबाईल काढण्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. कारागृहात जाण्यापूर्वी कैद्याने मोबाईल गिळले होते. कारागृहात गेल्यानंतर या कैद्याने पोटातील मोबाईल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. (2 cell phones stuck in stomach of inmates in tihar jail)

दिल्लीतील तिहार तुरुंगात कैद आहे कैदी

रमन सैनी असे या २८ वर्षीय कैद्याचे नाव आहे. हा कैदी जून-जुलैपासून तिहार तुरुंग क्रमांक एकमध्ये बंद आहे. पोलिसांच्या नोंदीतील तो कुख्यात दरोडेखोर आहे. न्यायालयात हजर राहून परत येताना कैद्याची तपासणी केली असता मेटल डिटेक्टर बीप करत असे. यानंतर त्याच्या पोटात काहीतरी असल्याचा संशय आला. तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, २९ ऑगस्ट रोजी नवभारत टाइम्समध्ये बातमी प्रकाशित झाल्यानंतर कैद्याला प्रथम DDU हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले. मात्र तेथे त्याच्या पोटात काय आहे याची खात्री डॉक्टरांना करता आली नाही. त्यानंतर त्याला जीबी पंत रुग्णालयात पाठवण्यात आले. १ सप्टेंबर रोजी कैद्याला जीबी पंत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्या दिवशीही त्याच्या पोटात मोबाईल असल्याबाबतचा तपास पूर्ण होऊ शकला नाही.

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींनंतर हा आहे काँग्रेसचा सर्वात लोकप्रिय नेता, जयराम रमेश यांनी केला मोठा खुलासा
अजूनही पोटात अडकलेले आहेत मोबाईल फोन

यानंतर कैद्याला पुन्हा तिहार तुरुंगातून जीबी पंत रुग्णालयात नेण्यात आले. जिथे एन्डोस्कोपी करून त्याच्या पोटातून दोन मोबाईल काढण्यात आले. हे फोन कैद्याच्या तोंडातून खेचून बाहेर काढले गेल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. कैद्याच्या पोटाची तपासणी केली असता त्याच्या पोटात आणखी दोन मोबाईल असल्याचे डॉक्टरांना समजले. मात्र, डॉक्टर ते काढू शकले नाहीत. कारण ते काढण्यासाठी कैद्याला शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. उर्वरित दोन्ही फोन कैद्याच्या जठराच्या खालच्या भागात अडकल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जठरातील हा भाग हा स्नायूंची एक झडप आहे, जी पचनाच्या पुढील टप्प्यापर्यंत अन्न पोटात ठेवण्याचे काम करते.

फोन काढण्यासाठी करावी लागेल ओपन सर्जरी

कैद्याच्या पोटातून मोबाईल काढणाऱ्या डॉक्टरांनी कारागृह प्रशासनाला त्याच्या पोटातील फोन काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे सांगितले. तुरुंग अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सध्या कैद्याच्या जीवाला कोणताही धोका नाही. पण फोन कालांतराने पोटातील ऍसिडमुळे खराब होतात. यानंतर फोनची बॅटरी त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकते. तुरुंगातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, डीडीयू हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅनसाठी त्याची तारीख निश्चित करण्यात आली होती, परंतु कैद्याने स्कॅन करण्यास नकार दिला. आम्ही त्याचे समुपदेशन केले आहे आणि स्कॅनसाठी पुन्हा नवीन तारीख मिळेल. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला वेदना होत नाहीत, म्हणून तो सहकार्य करत नाही. आम्ही नियमितपणे त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहोत आणि त्यांचे समुपदेशन करत आहोत.

मुंबई पोलिसांना आपणही कराल सलाम! ११ महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर असे पकडले चोर
तस्कर अशा प्रकारे फोन गिळतात

कैद्याने असे वर्तन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशी प्रकरणे समोर आली आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तस्करी करण्यासाठी असे डावपेच वापरले जातात. पण कधीकधी ते खूप धोकादायक बनते. मोबाइल फोनसारख्या वस्तू तस्करांकडून विशिष्ट पद्धतीने पॅक केल्या जातात. जर त्यांनी फोन थेट गिळला तर पोटातील आम्लामुळे त्यावर गंज चढतो. त्यामुळे तस्कर आधी फोन मिथिलीन ब्लूने गुंडाळतात. हा एक निळ्या रंगाचा पदार्थ आहे, जो वस्तूंना खराब होण्यापासून वाचवतो. त्यानंतर मोबाईल प्लास्टिक, पॉलिथिन, रबर, कंडोम किंवा फुगा अशा वस्तूंनी भरलेला असतो. कैद्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, त्याने अशी वस्तू गिळण्याची ही पहिलीच वेळ नाही.

ENG vs PAK: एका ‘पाकिस्तानी’नेच वाजवला पाकिस्तानचा बँड, बाबर चौथ्यांदा आदिल रशीदचा बळी
पत्नीने दिली ही माहिती

कैद्याच्या पत्नीनेही पोटात अडकलेले दोन फोन बाहेर काढण्याची विनंती केली आहे. त्या फोनमुळे पोटात स्फोट होऊ शकतो आणि त्यामुळे तिच्या पतीचा जीव धोक्यात येऊ शकतो, असे तिचे म्हणणे आहे. कैद्याने फोन का गिळला हे त्याच्या पत्नीला माहीत नाही. कैदी पॅरोलवर बाहेर आल्यानंतर वर्षभरापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. मात्र गेल्या ५ वर्षांपासून तो कारागृहातूनच महिलेशी बोलायचा. या दोघांची पहिली भेटही कारागृहातील व्हिजिटर रूममध्ये झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here