लवलेश पाटील असे या तरुणाचे नाव असून तो यूपीच्या बांदा जिल्ह्यातील बाबेरू भागातील रहिवासी आहे. त्याने बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. दुकानाला बेवफा चायवाला नाव देण्याचे कारण विचारल्यावर तो आपल्या मनाची अवस्था सांगू लागतो. कॉलेजमध्ये शिकत असताना एकत्र शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या प्रेमात पडल्याचे तो सांगतो. या तरुणीने त्याला प्रेमात धोका दिला. निराश होऊन तो सांगतो की प्रेम प्रत्येकाला होते, पण प्रेमात कोणीही कोणाला धोका देऊ नये.
हा तरुण सांगतो की शिक्षण पूर्ण करूनही त्याला नोकरी मिळत नव्हती, म्हणून त्याने चहाचे दुकान उघडण्याचा निर्णय घेतला. दुकानाला वेगळी ओळख देण्यासाठी मी मला धोका देणाऱ्या मैत्रिणीच्या नावावरून दुकानाचे नाव बदलून ‘बेवफा चायवाला’ असे ठेवले.
प्रेमात धोका मिळालेल्या तरुणांसाठी आहे ऑफर
या दुकानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रेमी युगुलांसाठी चहा १५ रुपयांना मिळतो आणि प्रेमात धोका मिळालेल्यांना १० रुपयांना चहा मिळतो. दुकानाच्या नावाच्या आकर्षणामुळेच चहा प्यायला आल्याचे येथील चहा पिणारे लोक सांगतात. लवलेश चहाही अगदी मनापासून बनवतो. चहा प्यायल्यानंतर चहाचा दर्जा कळतो. या दुकानात संध्याकाळी खूप गर्दी असते. यामध्ये प्रेमीयुगुल, मैत्रिणी किंवा विवाहित जोडपे चहाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. तेथे सकाळच्या वेळी बहुतांश तरुण असतात.