ग्रामपंचात सदस्य लालासाहेब फाळके यांनी सांगितले की, गावाने पुढाकार घेऊन यासाठी नियमावली तयार केली आहे. त्याची सूचना दर्शनी भागावर लावण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे, सर्व ट्रॅक्टर धारकांना काष्टी ग्रामपंचायतकडून कळकळीची विनंती आहे. साखर कारखाने सुरू झाले आहेत. ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडीतून उसाची वाहतूक केली जात आहे. जिल्ह्यात एक हजारहून अधिक ट्रॅक्टरद्वारे उसाची वाहतूक केली जात आहे. उसाची सिंगल ट्रॉली व डबल ट्रॉलीतून उसाची वाहतूक केली जाते. ऊस वाहतूक करताना लाईटचा वापर करताना ट्रॅक्टर चालकांकडून हयगय केली जात असल्याचे पहायला मिळत आहे.
अनेक ट्रॅक्टरचालक फक्त एकाच हेड लाईटचा वापर केला जाते. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनधारकाची फसगत होते. समोरून मोटार सायकल येत आहे, या अंदाजाने वाहन चालवत असतात पण ट्रॅक्टर जवळ आल्यावर वाहनचालकाच्या लक्षात येते. त्यामुळे समोरून येणारी वाहने ट्रॅक्टवर आदळण्याचे प्रमाण वाढले आहे.
तर दुसरीकडे सिंगल व डबल ट्रॅक्टरच्या मागे ब्रेक लाईट नसतो. फक्त रिफेलेक्टरच्या अंदाजाने वाहन चालवावे लागते. अनेक ट्रॅक्टर ट्रॉलीना रिफलेक्टर नाहीत तर काही ट्रॉलींना जुनेच रिफलेक्टर असल्याने ते खराब झाले आहेत. ट्रॅक्टरच्या मागे एक लाईट असावा अशी सूचना असताना सुद्धा ट्रॅक्टर चालक दुर्लक्ष करतात. तसेच आरटीओ विभागही ट्रॅक्टर चालकांना मागे लाईट लावण्याबाबत पाठपुरावा करत नाही. तरी या पुढे जर असे आढळले तर त्यावर सक्त कारवाई केली जाईल.
हेही वाचा : ट्रॅक्टर चालकाची एक चूक तिघा सख्ख्या मित्रांच्या जीवावर, शेजार-शेजारीच सरणं रचली
काष्टी गावच्या परिसरामध्ये जर कोणी रात्रीच्या वेळी किंवा दिवसा गाण्याचा मोठा आवाज करून सुसाट वेगाने जाताना जर कोणी आढळला तर त्याला समज देऊन पोलिसांकडे तक्रार केली जाईल, अशी समज ग्रामस्थांनी दिली आहे.

हेही वाचा : घराच्या अंगणात चिमुरड्यावर काळाचा घाला, खेळता-खेळताच गमावला जीव