मुंबई : बजाज हाऊसिंग फायनान्स (बीएचएफएल) या बजाज फायनान्स लिमिटेडच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने ग्राहकांसाठी नुकतीच ई-होम लोन ही सेवा सादर केली. सहजसोप्या आणि वेळेची बचत करणाऱ्या अर्ज प्रक्रियेमुळे कर्जदारांची कर्जाची गरज ऑनलाइन भागवली जावी या पद्धतीने बजाज हाऊसिंग फायनान्स ई-लोन्सची रचना करण्यात आली आहे. घरासाठीचे नवे कर्ज अथवा सध्याचे गृहकर्ज ट्रान्सफर या सुविधा यामध्ये आहेत.

आरंभापासून शेवटपर्यंत संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असल्याने ग्राहकांना आपल्या घरात आरामात बसून ई-होम लोनसाठी अर्ज करता येईल. तसेच कर्जदारांना त्यांचे सध्याचे गृहकर्ज अगदी सहज, कमीतकमी कागदपत्रांसह आणि कमी व्याजदरासाठी बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडे ट्रान्सफर करता येईल. याशिवाय अर्जदारांनी प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज केल्यास त्यांच्या गृहकर्जावर ६.५ टक्क्यांपर्यंतची सवलतीचा लाभ घेता येणार आहे. कर्जदारांना कर्जाची काही रक्कम मुदतीआधीही भरता येईल असे कंपनीने म्हटलं आहे.

गृहकर्जाची मंजुरी वेगाने झाल्याने वॅलिडिटी काळात किती कर्ज मंजूर केले जाणार आहे याचा आकडा कळतो. त्यामुळे, आपल्या आर्थिक नियोजनात स्पष्टता येतेच शिवाय संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित, वेगवान आणि सोयीस्कर होते. ई-होम लोनसह बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडतर्फे कर्ज अर्जाची छाननी पूर्ण झाल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत ऑनलाइन डिजिटल सँक्शन लेटर जारी केले जाऊ शकते (अटी आणि शर्थी लागू). त्याचप्रमाणे, ग्राहकांना कर्ज परतफेडीसाठी ३० वर्षांपर्यंतच्या मुदतीची लवचिकता देण्यात आली आहे, असे यावर बजाज हाऊसिंग फायनान्सच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

संपूर्ण अर्जप्रक्रिया सोपी असून ग्राहक चार टप्प्यांनंतर गृहकर्ज मिळवू शकतात

– कर्जासाठी अर्ज : ग्राहकांना कर्जासाठीच्या ऑनलाइन अर्जात माहिती (वैयक्तिक/व्यावसायिक/मालमत्ता) भरावी लागेल

– ऑफर तयार करणे : कर्जाच्या अर्जाची छाननी झाल्यानंतर लोन ऑफर तयार केली जाईल

– डिजिटल सँक्शन लेटर : ऑफरवर आधारित डिजिटल सँक्शन लेटर सादर केले जाईल. ग्राहकांना नाममात्र फी भरून हे पत्र डाऊनलोड करता येईल. या डिजिटल लेटरला सहा महिन्यांची मुदत असेल.

– कर्ज मिळणे : कर्ज मिळवण्यासाठी ग्राहकांनी सँक्शन लेटरमध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा फोन क्रमांकावर सहा महिन्यांच्या मुदतीच्या काळात बीएचएफएलशी संपर्क साधावा.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here