नवी दिल्ली :रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. खरं तर, मंत्रालयाने अ‍ॅपद्वारे अनारक्षित तिकीट बुक करण्यासाठी निश्चित केलेले अंतर वाढवले आहे. आता प्रवाशांना प्रवास सुरू करणाऱ्या स्थानकापासून २० किमीच्या अंतरावरूनही अ‍ॅपद्वारे तिकीट बुक करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहणे टाळता येणार आहे. अनारक्षित तिकिटांच्या बुकिंगमध्ये या सवलतीचा लाभ सर्व प्रवाशांना मिळणार आहे. (now general tickets can be booked from 20 km away from mobile)

‘या’साठी नियमांमध्ये करण्यात आले बदल

खरेतर, आत्तापर्यंत, प्रवासी आपला प्रवास सुरू होणाऱ्या स्थानकापासून केवळ २ किमीच्या परिघातूनच तिकीट बुक करू शकत होते. यामध्ये अनेक वेळा मोबाईलवरून नेटवर्क गायब झाल्यामुळे लोकांना तिकीट काढता येत नव्हते. त्यामुळे अनेकवेळा लोकांना तिकीट काढताना अडचणींचा सामना करावा लागत होता. हा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत होता. हे पाहता आता मंत्रालयाने हे अंतर वाढवले आहे. आता प्रवासी स्टेशनपासून २० किमी अंतरावरूनही तिकीट बुक करू शकणार आहेत.

बेवफा चायवाला…नावच पुरे, धोक्यानंतर उघडले हे दुकान; ब्रेकअप झालेल्या प्रेमींसाठीही ऑफर
ही आहे नवीन व्यवस्था

नवीन व्यवस्थेनुसार, उपनगरी नसलेल्या वर्गातील प्रवासी आता या सुविधेचा लाभ घेऊन निर्धारित पाच किलोमीटरच्या ऐवजी २० किलोमीटर अंतरावरूनही अनारक्षित तिकीट बुक करू शकतील. यासोबतच उपनगरीय विभागासाठी तिकीट आरक्षित करण्यासाठी समान अंतराचे निर्बंध सध्याच्या २ किलोमीटरवरून ५ किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आले आहेत.

ऐकावं ते नवलच! तिहार तुरुंगातील कैद्याने गिळले ५ मोबाईल, अवस्था बिकट, पोटात अजूनही आहेत काही मोबाईल
प्रवाशांची होणार मोठी सोय

रेल्वे मंत्रालयाच्या या बदलामुळे आता प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. आता प्रवाशांना अनारक्षित रेल्वे तिकीट सहजपणे बुक करता येणार आहे. आतापर्यंत, कमी अंतरामुळे, तसेच मोबाइल नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे अनेक वेळा प्रवाशांना तिकीट काढता येत नव्हते. यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. आता या निर्णयामुळे सर्व प्रवाशांना मोठाच दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here