Authored by प्रसाद रानडे | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 15 Nov 2022, 8:48 am

Raigad News : कोकणात खेड लोटे एमआयडीसी पाठोपाठ आता रायगड जिल्हयातील महाड एमआयडीसीत प्रसोल कंपनीत झालेल्या विषारी वायू गळत झाली आहे. या विषारी वायू गळतीमुळे जितेंद्र आडे (वय ४०) रा. वालन (कॉन्ट्रेक्ट लेबर) याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

 

MIDC Prasol Company
रायगड : महाड MIDC मधील कंपनीत वायू गळती, एका कामगाराचा मृत्यू, दोन जण जखमी
रायगड : कोकणात खेड लोटे एमआयडीसी पाठोपाठ आता रायगड जिल्हयातील महाड एमआयडीसीत प्रसोल कंपनीत झालेल्या विषारी वायू गळत झाली आहे. या विषारी वायू गळतीमुळे जितेंद्र आडे (वय ४०) रा. वालन (कॉन्ट्रेक्ट लेबर) याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. तर या घटनेत दोन कामगारांनाही वायू गळतीचा त्रास झाल्याने त्यांना देशमुख हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कंपनीतील प्रशांत किंकले (स्टोअर इंन्चार्ज), मिलिंद मोरे (स्टोअर) हे दोन कर्मचारी अत्यवस्थ झाले होते. आता या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन लक्ष ठेऊन आहेत. तहसीलदार सुरेश काशीद यांनी भेट दिली आहे. दरम्यान, प्रांताधिकार प्रतिमा पुदलवाड यांनी प्रशासनाल योग्य त्या सूचना दिल्या असून लक्ष ठेवून आहेत.

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवडताना न्यूझीलंडने दिला धक्का; दोघा दिग्गजांना बाहेरचा रस्ता

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here