मुंबई : मुंबईतल्या तरुणीची दिल्लीमध्ये हत्या झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली असून या घटनेमध्ये आता धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. अशात या प्रकरणावर राम कदम यांनी एक ट्वीट केलं असून हे प्रकरण लव्ह जिहादचे असल्याचा सवाल विचारला आहे. मुंबईतील आफताब अमीनसोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या श्रद्धाची निर्घृण हत्या करण्यात आली. यासंबंधी पोलीस तपास करत असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

राम कदम यांनी ट्वीट करत म्हणाले की, ‘हे #lovejihad चं प्रकरण आहे का? आम्ही दिल्ली पोलिसांनी विनंती करतो की त्यांनी वसईमध्ये राहणाऱ्या श्रद्धाच्या हत्येविषयी कसून चौकशी करावी आणि आरोपी धर्म परिवर्तन करण्याच्या तयारीत होता का? आणि श्रद्धाने नकार दिला का? यामुळे तर तीची हत्या झाली नसावी? हत्येमागचं नेमकं कारण काय? हे लव्ह जिहादचं प्रकरण तर नाही?’ असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे.

दरम्यान, मुंबईतील आफताब अमीनसोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या श्रद्धाच्या हत्येमागचं खरं कारण म्हणजे काही दिवसांपासून दोघांमध्ये होणारा वाद. दोघेही एकमेकांवर संशय घेऊ लागले. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडणं व्हायची. यातून आफताब श्रद्धाला मारहाण करू लागला होता, असा आरोप श्रद्धाच्या नातेवाईकांनी केला आहे. १८ मे रोजी रात्री दोघांमध्ये भांडण झाले आणि आफताबने श्रद्धाचा गळा आवळून खून केला. मृतदेहाचे ३५ तुकडे करून छतरपूरच्या जंगलात आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले.

Aftab Killed Sharadha: पालघरच्या श्रद्धाचा भयंकर शेवट; लिव्ह इन पार्टरनकडून क्रुरतेचा कळस
आफताबने श्रद्धाला का मारलं?

पोलीस चौकशीत आरोपी आफताब आलमने सांगितलं की, दोघेही मुंबईपूर्वी मार्च-एप्रिल महिन्यात हिल स्टेशनवर गेले होते. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवसात ते मेहरौली परिसरात आले. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी छतरपूर टेकडीवरील गल्ली क्रमांक-१ मध्ये एक खोलीचा फ्लॅट भाड्याने घेतला. इथे १८ मे रोजी रात्री त्याने श्रद्धाचा गळा आवळून खून केला. यानंतर मृतदेह करवतीने कापून हळूहळू विल्हेवाट लावला.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here