pune ambegaon news, पुणे : आंबेगाव तालुक्यातील लौकी गावाचे जवान शहीद; अख्खं गाव हळहळलं – sudhir thorat of lauki village in ambegaon taluka has been martyred
पुणे : पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील लौकी येथील रहिवासी असणारे फौजी सुधीर पंढरीनाथ थोरात (वय ३२) मध्यप्रदेश ग्वालियर येथे ते शहीद झाले आहेत. सुधीर हे अचानक गेल्याने त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी येताच त्यांच्या घराबाहेर मोठा जनसागर उपस्थित झाला आहे.
सुधीर थोरात हे २०१४ पासून भारतीय सुरक्षा फोर्समध्ये (BSF) कार्यरत होते. त्यांना घोडस्वारीमध्ये अनेक सुवर्णपदके मिळालेली आहेत. तसेच पुढील दोन दिवसांत ग्वालियर या ठिकाणी घोडेस्वारीच्या इंटरनॅशनल स्पर्धा होणार होत्या. मात्र, त्या स्पर्धेचा सरावादरम्यान रविवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांचे घोड्यावरून पडून घोड्याची टाप त्यांच्या डोक्याला लागल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. फौजी सुधीर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. फ्रिजमध्ये श्रद्धाचा मृतदेह, तर रुममध्ये दुसऱ्या मुलीसोबत सुरू होता अफताबचा रोमान्स घोडस्वारी संपल्यानंतर ते याच महिन्याच्या ३० तारखेला सुट्टीवर येणार होते. सुधीर थोरात यांच्यावर त्यांच्या मूळ गावी लौकी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावामध्ये त्यांचे सर्वांशी चांगले वागणे होते. सर्वांशी मिळून मिसळून राहात असे. कमी वयात असं मरण आल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
सुधीर थोरात हे अंत्यत मनमिळावू स्वभावाचे होते. जरी ते बॉर्डरवर असले तरी त्यांचा त्यांच्या गावाशी चांगला स्नेह होता. मात्र, त्यांचे अचानक जाणे हे सर्वांच्याच मनाला चटका लावून जाणारे आहे.