बीड : धारुर तालुक्यात पुन्हा अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील चोरांबा येथील चारशे फूट उंच डोंगरावर अज्ञात इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी काल उघडकीस आली. थेटेगव्हाण येथील पोलीस पाटील यांच्या खबरीवरून धारूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

धारुर तालुक्यातील चोरांबा, थेटेगव्हाण जवळ असलेल्या चारशे फूट उंच डोंगरावर एका लिंबाच्या झाडाला अंदाजे ४० ते ४५ वय असलेल्या इसमाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत गुरे चारणाऱ्या व्यक्तींना आढळून आला. चोरंबा येथील पोलीस पाटील यांना सदर घटना समजल्यावर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर धारूर पोलीस ठाण्यामध्ये सदर घटनेची माहिती देण्यात आली. सदर इसमाने आत्महत्या केल्याचा अंदाज लावला जात आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या वकिलांनी कोर्टात थेट जुना व्हिडिओच दाखवला; प्रकरणात नवा ट्विस्ट?
आत्महत्या करणारी व्यक्ती ही अज्ञात असून मागील पाच ते सहा दिवसांपूर्वी ही घटना घडलेली असल्याने पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत मृतदेह होता. कापडी रुमालाच्या सहाय्याने लिंबाच्या फांदीला गळफास घेतल्याचे घटनास्थळी दिसून आले. भोगलवाडी येथील आरोग्य अधिकारी यांनी घटनास्थळी उत्तरीय तपासणी करून मृतदेहाचा चोरंबा येथील गायरानामध्ये अंत्यविधी करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी धारुर घाटात व कारी शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना ताजी असताना आज चोरांबा शिवारात सदरील मृतदेह आढळून आला. महिन्यातील ही तिसरी घटना आहे. वारंवार अशा घटना निदर्शनास येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

बारावीपर्यंत शिक्षण, मग BBAला ऍडमिशन, अनेक तरुणींशी संबंध; आफताबबद्दलची बरीच माहिती समोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here