मुंबई: पालघरची रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकरची दिल्लीत निर्घृण हत्या झाली. प्रियकर आफताब अमीन पुनावालानं श्रद्धाला निर्घृणपणे संपवलं. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते ठेवण्यासाठी एक फ्रिज आणला. आफताब श्रद्धाच्या मृतदेहाचा एक तुकडा घेऊन रोज रात्री २ वाजता घरातून निघायचा. मृतदेहाचा तुकडा जंगलात फेकून तो घरी परतायचा. श्रद्धाच्या हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे.

आफताब श्रद्धाला मारहाण करायचा. अनेकदा तो तिला मारायचा. लग्न करण्याचा आग्रह धरणाऱ्या श्रद्धाला आफताबनं संपवलं. आफताबकडून होत असलेली मारहाण पाहून श्रद्धाला पुढे काय घडणार याची कल्पना आली होती. आपली हत्या होऊ शकते असं तिला वाटत होतं. तिनं मित्रांकडे मदतही मागितली होती.
बारावीपर्यंत शिक्षण, मग BBAला ऍडमिशन, अनेक तरुणींशी संबंध; आफताबबद्दलची बरीच माहिती समोर
आफताब श्रद्धाला खूप मारायचा. एकदा तिनं मला व्हॉट्स ऍपवर मेसेज केला होता. मी आज त्याच्यासोबत (आफताब) थांबले, तर तो मला संपवेल, अशा आशयाचा मेसेज श्रद्धानं तिचा मित्र लक्ष्मण नाडरला केला होता. आम्ही त्या दिवशी तिला घरातून वाचवलं होतं. आम्ही तुझी पोलिसात तक्रार करू, असा धमकीवजा इशारा आफताबला दिला होता. मात्र श्रद्धानं आम्हाला तक्रार करू दिली नाही, असं नाडरनं सांगितलं.
प्रेयसीला निर्घृणपणे संपवलं, मग ३०० लीटरचा फ्रिज आणला; प्रियकर रोज रात्री दोनला निघायचा अन्…
श्रद्धा गेल्या दीड महिन्यांपासून मित्रमैत्रिणींच्या संपर्कात नसल्याचं नाडरनं श्रद्धाच्या भावाला ऑगस्टमध्ये सांगितलं होतं. श्रद्धाच्या भावानं ही गोष्ट वडिलांना सांगितली. त्यानंतर त्यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात श्रद्धा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. ‘दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ श्रद्धाचा मित्रांशी कोणताच संपर्क नव्हता. तिनं माझ्या मेसेजलादेखील रिप्लाय दिले नाहीत. तिचा फोन ऑफ होता. त्यामुळे मला चिंता वाटू लागली. मी बाकीच्या मित्रांकडे श्रद्धाबद्दल विचारपूस केली. मात्र काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे मी श्रद्धाच्या भावाशी संपर्क साधला’, अशा शब्दांत नाडरनं संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here