दोहा : फुटबॉल वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच आखाती देशात फिफा वर्ल्डकप होत आहे. येत्या रविवारपासून म्हणजेच २० नोव्हेंबरला वर्ल्डकपला सुरूवात होणार आहे. टी-२० क्रिकेट वर्ल्डकपनंतर आता क्रीडा चाहत्यांना विशेषत: फुटबॉल चाहत्यांना एक मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. फिफा वर्ल्डकपचा थरार या महिन्यात पहायला मिळणार आहे. फुटबॉल वर्ल्डकपच्या आधी या स्पर्धेबद्दल सर्व काही जाणून घ्या.

कतारमध्ये होणारी ही वर्ल्डकप स्पर्धा कधी सुरू होईल, केव्हापर्यंत चालणार ही स्पर्धा, स्पर्धेत किती संघ आणि किती ग्रुप आहेत, लाईव्ह सामने कधी आणि कुठे पाहू शकाल या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला देणार आहोत.

वाचा- फुटबॉल वर्ल्ड कप: ब्राझील आणि पोर्तुगालला बसणार फटका

फिफा वर्ल्डकप २०२२ कधी सुरू होणार आहे?

>> फिफा वर्ल्डकप २०२२चे आयोजक कतार असून ही स्पर्धा २० नोव्हेंबर पासून सुरू होईल आणि त्याची फायनल १८ डिसेंबर रोजी होणार आहे. फिफा वर्ल्डकपचा हा २२ वा हंगाम आहे. याआधी ही स्पर्धा कधीच आखाती देशात झाली नव्हती.

फिफा वर्ल्डकपमध्ये किती संघ आहेत आणि किती ग्रुपमध्ये संघ विभागण्यात आलेत?

>>या वेळी फिफा वर्ल्डकपमध्ये ३२ संघ असून त्यांना ८ ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये ४ संघ आहेत.

वाचा- FIFA World Cup 2022: ग्रुप-अ, नेदरलँड्सचे गटात एकतर्फी वर्चस्व अपेक्षित

फिफा वर्ल्डकप २०२२ मधील ग्रुप आणि त्यातील संघ?

ग्रुप A- कतार, इक्वाडोर, सेनेगल, नेदरलँड्स
ग्रुप A- इंग्लंड, इराण, अमेरिका आणि वेल्स
ग्रुप A- अर्जेंटिना, सौदी अरब, मॅक्सिको, पॉलंड
ग्रुप A- फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, ट्यूनेशिया
ग्रुप A-स्पेन, कोस्टारिका, जर्मनी, जपान
ग्रुप A-बेल्जियम, कॅनडा, मोरक्को, क्रोएशिया
ग्रुप A-ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमरून
ग्रुप A-पोर्तुगाल, घाना, उरुग्वे, कोरिया रिपब्लिक

ग्रुप फेरीच्या लढती कधी होणार

>>फिफा वर्ल्डकप २०२२ मध्ये ग्रुप फेरीच्या लढती २२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या काळात होणार आहेत

फिफा वर्ल्डकप २०२२ मध्ये क्वार्टर फायनलच्या लढती कधी होतील.

>>फिफा वर्ल्डकप २०२२ मध्ये राउंड ऑफ १६च्या लढती ३ ते ६ डिसेंबर या काळात होणार आहेत.

वाचा- इंग्लंडचा संघ वेल्स, अमेरिका आणि इराणपेक्षा खूपच सरस, पण इराण गटातील धोकादायक संघ ठरणार

फिफा वर्ल्डकप २०२२ मध्ये सेमीफायनलच्या लढती कधी होणार?

>>फिफा वर्ल्डकप २०२२ मधील अव्वल ४ संघात १३ आणि १४ डिसेंबर रोजी लढत होतील.

फिफा वर्ल्डकप २०२२ मध्ये तिसऱ्या स्थानासाठीची मॅच कधी होणार?

>>फिफा वर्ल्डकप २०२२ मध्ये तिसऱ्या स्थानासाठीची लढत १७ डिसेंबर रोजी होईल.

फिफा वर्ल्डकप २०२२ ची फायनल मॅच कधी आणि कोठे होणार?

>>फिफा वर्ल्डकप २०२२ ची फायनल मॅच १८ डिसेंबर रोजी होणार असून ही लढत लुसॅल स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार ही लढत रात्री ८.३० वाजता सुरू होईल.

फिफा वर्ल्डकप २०२२ मध्ये किती सामने आणि कोणत्या मैदानावर होणार?

>> स्पर्धेतील ३२ संघांमध्ये ६४ लढती होतील. यासाठी ८ स्टेडियम तयार करण्यात आली आहेत. अल बायत, खलीफा इंटरनॅशनल, अल थुमामा स्टेडियम, अहमद बिन अली स्टेडियम, लुसॅल स्टेडियम, स्टेडियम ९७४, एज्युकेशन सिटी स्टेडियम आणि जानॉब स्टेडियम अशी त्यांची नावे आहेत.

भारतात फिफा वर्ल्डकप २०२२ कुठे लाईव्ह पाहता येईल?

>> भारतीय चाहत्यांना फिफा वर्ल्डकप २०२२ चे सर्व सामने स्टार स्पोर्ट्सवर लाइव्ह पाहता येतील. त्याच बरोबर जिओ सिनेमावर त्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतील. भारतीय वेळेनुसार लढती दुपारी ३.३०, संध्याकाळी ६.३०, रात्री ८.३०, रात्री ९.३०, रात्री १२.३० वाजता सुरू होणार आहे.

सर्वाधिक वर्ल्डकप जिंकणारे संघ

ब्राझील- ५
जर्मनी- ४
इटली- ४
अर्जेंटिना- २
फ्रान्स- २
उरुग्वे- २
इंग्लंड- १
स्पेन- १

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here