नवी दिल्ली: नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड (NDTV) या दिग्गज मीडिया कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कंपनीचे शेअर्स इंट्राडेमध्ये ५ टक्के वाढीसह ३८३.०५ रुपयांवर व्यवहार करत आहेत. गेल्या पाच दिवसांत शेअर जवळपास ४ टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागे एक प्रमुख कारण म्हणजे सेबीने सोमवारी NDTV मधील २६% शेअर ओपन ऑफरद्वारे खरेदी करण्यास गौतम अदानींच्या नेतृत्वातील अदानी समूहाला मान्यता दिली आहे. गुंतवणूकदारांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे ओपन ऑफर २२ नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि ५ डिसेंबरला बंद होईल.

काय आहे सौदा
अदानी समूहाने ऑगस्टमध्ये विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (VCPL) विकत घेतले होते. VCPL ने एक दशकापूर्वी एनडीटीव्हीच्या संस्थापकांना वॉरंटच्या विरोधात ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज दिले होते. कर्ज न भरल्यास एनडीटीव्हीच्या संस्थापकांनी कंपनीला मीडिया समूहातील २९.१८ टक्के भागभांडवल विकत घेण्याची परवानगी दिली. याद्वारे अदानी समूहाने कंपनीमधील शेअर विकत घेतला आहे. कंपनी हा हिस्सा ओपन ऑफर अंतर्गत खरेदी करत आहे. खुल्या ऑफर अंतर्गत, अधिग्रहण करणारी कंपनी तिच्या डीलमध्ये खरेदी करणार असलेल्या फर्मच्या भागधारकांना सामील करते. ओपन ऑफर ही विक्री करणार्‍या कंपनीच्या विनिर्दिष्ट भागधारकांना विनिर्दिष्ट किंमतीला समभाग विकण्याची ऑफर असते.

अदानींच्या ऑफरला SEBIचा सिग्नल, NDTV मधील स्टॉक खरेदी करण्याचा रस्ता मोकळा
कंपनीच्या शेअर्सची स्थिती
एनडीटीव्ही स्टॉकने यावर्षी YTD मध्ये २३३.२३% परतावा दिला आहे. म्हणजेच या काळात हा शेअर ११४.९४ रुपयांवरून ३८३.०५ रुपयांपर्यंत वाढला आहे. या समभागाने गेल्या एका वर्षात ३६५.१५% चा मजबूत परतावा दिला आहे आणि ८२.३५ रुपयांवरून सध्याच्या शेअरच्या किमतीपर्यंत वाढ झाली आहे.

पैशाचा पाऊस पडणार! टाटांचा हा शेअर ५ हजारपार जाऊ शकतो, झुनझुनवालांचा होता आवडता स्टॉक
गुंतवणूकदारांनाही संधी

अदानी समूहाने ओपन ऑफरमध्ये प्रति शेअर २९४ रुपये दराने स्टॉक खरेदी करण्याची संधी दिली आहे. जर ही ओपन ऑफर पूर्णपणे सबस्क्राइब झाली तर ग्रुपला ४९२.८१ कोटी रुपये मिळतील. मीडिया आणि ब्रॉडकास्टवर भर देण्यासाठी आणि पुढच्या पिढीचे व्यासपीठ तयार करण्यासाठी एनडीटीव्हीचे अधिग्रहण करण्यात आल्याचे अदानी समूहाने शेअर बाजाराला सांगितले आहे. यासाठी NDTV हे योग्य प्रसारण आणि डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

एनडीटीव्हीच्या समभागांना अपर सर्किट
अदानी समूहाने खरेदी केल्याचे वृत्त आणि सेबीने ओपन ऑफरला मंजुरी दिल्यानंतर कंपनीचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी वधारले. सोमवारी, त्याचे समभाग बीएसईवर १.९९ टक्क्यांनी वाढले होते, त्यामुळे आज मंगळवारी, सुरुवातीच्या ट्रेडमध्येच ५ टक्क्यांचा अप्परचा सर्किट सेट झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here