१. फूड व्लॉगर असल्याने चॉपिंगबद्दल शिकला होता
व्यवसायाने शेफ असलेला आफताब स्वतःला फूड ब्लॉगर म्हणायचा. त्याला जेवणाशी संबंधित व्हिडिओ खूप आवडायचे. तो बातम्याही तशाच वाचायचा. त्याने सहा वर्षांपूर्वी फेसबुकवर अशीच एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये भाज्या आणि फळे कापण्यात तज्ञ होण्यासाठी टिप्स देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये काढलेली काही छायाचित्रेही होती. भाजी कापण्याचं कौशल्य शिकलेल्या आफताबने आपल्या प्रेयसीचे तुकडे कसे केले, या सर्व गोष्टी आता देशाला हैराण करत आहेत. आता पोलीस श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे जंगलात शोधत आहेत, जे त्याने अनेक महिन्यांपूर्वी फेकले होते. अनेक दिवस आफताब मध्यरात्री इकडे तिकडे फिरायचा आणि मृतदेहांचे तुकडे जंगलात किंवा हिरवळीच्या ठिकाणी फेकत होता. तो शेफ होता आणि नंतर फोटोग्राफर बनला आणि नंतर फूड व्लॉगिंग करायला लागला.
२. गळा दाबणे सोपे, मृतदेहाची विल्हेवाट लावणं कठीण होतं
आफताबने पोलिसांना सांगितले की, त्याच्या लिव्ह-इन पार्टनरचा गळा दाबून खून करणे सोपे होते, परंतु तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे कठीण होते. त्याला वाटले की शरीराचे तुकडे करणे चांगले होईल, जेणेकरुन त्याची विल्हेवाट लावणे सोपे होईल. त्यामुळे त्याने इंटरनेटची मदत घेतली. त्याचा आवडता टीव्ही शो ‘डेक्स्टर’ने त्याला या योजनेत मदत केली. त्याने प्रथम ३०० लिटरचा फ्रीज विकत घेतला. २८ वर्षीय पूनावाला याने शेफ म्हणून प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे पुढे काय करायचे ते त्याला माहीत होते. फ्रीजसोबतच त्याने मांस कापण्यासाठी चाकूही खरेदी केला. यानंतर, त्याने श्रद्धाच्या शरीराचे छोटे-छोटे तुकडे केले. त्याने सांगितले की हे काम इतके सोपे नाही, म्हणून त्याने दारु प्यायली आणि तोंडावर कापड बांधला. अत्तराच्या डझनभर बाटल्या आणि उदबत्त्या पेटवल्या ज्यामुळे सर्वत्र सुगंध दरवळत राहिल.

तू गेलीस तर स्वत:ला संपवेन, आधी ब्लॅकमेल मग हत्या
३. १० हजाराची खोली भाड्याने
जेव्हापासून ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आली तेव्हापासून छतरपूर पहाडीच्या गली क्रमांक १ मधील रहिवाशांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. त्या मुलाच्या चेहऱ्यावर त्यांना कधीही तणाव दिसला नाही. त्याने घर क्रमांक ९३/१ मध्ये १० हजार रुपये महिना भाड्याने खोली घेतली होती. त्याच्याकडे कोणीही कधी संशयाने पाहिलं नाही. शेजारी राहणाऱ्या कुसुम लता म्हणाल्या, “ते सामान्य माणसासारखे वागायचे आणि त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी शांत भाव असायचा.” १५ मे रोजी तो या फ्लॅटवर आला आणि तीन दिवसांनी त्याने श्रद्धाची हत्या केली. स्थानिकांनी सांगितले की पूनावाला सहसा फक्त जेवणाची डिलिव्हरी घेण्यासाठी आणि किराणा सामान खरेदी करण्यासाठीच बाहेर पडत असे.
४. इमोशनल ब्लॅकमेल, तू गेलीस तर आत्महत्या करेन
आजूबाजूच्या काही लोकांनी आफताबला रात्री उशिरा बाहेर पाहिले होते, त्यांना वाटले की तो ड्युटीवर जात आहे. प्रेम यांनी सांगितले की त्यांना उन्हाळ्यात आफताबच्या फ्लॅटमधून आवाज ऐकू आला होता. पण, भांडणानंतर मोठ्या आवाजात संगीत ऐकू आले. आफताब तिचा मानसिक छळ करत असल्याने श्रद्धा या नात्यावर खूश नसल्याचं कुटुंबीय सांगतात. मात्र आफताब तिला इमोशनली ब्लॅकमेल करत असल्याने तिने हे नातं तोडलं नाही. तिने त्याला सोडले तर तो आत्महत्या करेल असंही त्याने सांगितले होते.
५. गुगलवर सर्च केलं रक्त कसं साफ करायचं
श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने गुगलवर रक्त साफ कसं करायचं हे सर्च केलं. चित्रपटातून प्रेरित होऊन त्याने शरीराचे तुकडे करण्यासाठीही गुगलचा वापर केला होता. आफताबने अॅसिडने फरशी साफ केल्यानंतर डीएनए काढण्याचेही परिश्रम घेतले. श्रद्धाचा मित्र रजत शुक्लाने सांगितले की, २०१९ नंतर श्रद्धा खूप रीझर्व्ह राहू लागली होती. आई वारली होती आणि श्रद्धा वडिलांशीही बोलत नव्हती, याचा फायदा आफताबने घेतला. श्रद्धाने तिच्या आवडीने कुटुंबाशी नातं तोडलं. नंतर जेव्हा तिला अस्वस्थ वाटू लागलं, तेव्हा आता काय करायचं या संभ्रमात ती पडली असावी. कारण, सगळ्यांशी संबंध तोडून तिने आफताबवर विश्वास ठेवला होता. मात्र, तो तिच्यावर अत्याचार करु लागला होता.
पोलीस जंगलात फिरत आहेत
सध्या दिल्ली पोलीस जंगलात फिरत आहेत. श्रद्धाच्या मृतदेहाचे अनेक भाग अद्यापही सापडलेले नाहीत. तिचे शीर अद्याप सापडलेलं नाही. मेहरौली पोलिसांना केवळ ५ दिवसांचा रिमांड मिळाला आहे. उर्वरित ४ दिवसांत मृताच्या डोक्याशिवाय शरीराचे इतर भाग आणि ज्या धारदार शस्त्राने तिचे शरीर कापण्यात आले होते. ते सापडणे पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. दक्षिण जिल्ह्याचे अतिरिक्त डीसीपी अंकित चौहान यांनी सांगितले की, जे फॉरेन्सिक पुरावे गोळा करायचे होते ते पूर्ण झाले आहेत. आता पोलीस जास्तीत जास्त डिजिटल पुरावे गोळा करण्यात गुंतले आहेत. सुमारे १२-१३ भाग सापडले असून पोलीस पथक पुढील तपास करत आहे.
ठाकरेंना सोडून दीपाली सय्यद शिंदेंकडे निघाल्या, पण त्यापूर्वीच भाजपने अडकवलं