सलमाननं कमी उंचीवरून उड्डाण करत असलेल्या हर्क्युलिस सी-१३० या विमानातून उडी घेतली. सलमानसोबत इतर सैनिकदेखील झेपावले. इतर सैनिकांनी पॅराशूट्स उघडली. मात्र सलमानचं पॅराशूट उघडलं नाही. तो जमिनीवर कोसळला. सलमानच्या शरीराच्या खालील भागाला दुखापत झाली आहे. तो रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
विमानातून उडी मारल्यानंतर आमच्या एका सैनिकाचं पॅराशूट उघडलं नाही. पॅराशूटच्या दोऱ्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या असल्यानं त्याला पॅराशूट उघडता आलं नाही, अशी माहिती क्विक रिऍक्शन फोर्सचे प्रवक्ते कर्नल गुनवान यांनी दिली. जमिनीवर पडलेला सैनिक जखमी झाला. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे, असंही त्यांनी सांगितलं.
इंडोनेशियाचं क्विक रिऍक्शन फोर्स Kopasgat नावानं ओळखलं जातं. ही तुकडी इंडोनेशियाच्या हवाई दलाचा भाग आहे. या युनिटला ऑरेज बेरेट्सदेखील म्हटलं जातं. दहशतवादविरोधी कारवाया करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. विमान हायजॅकिंग, गोपनीय कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असतो.