Maharashtra Politics |माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी तो व्हिडिओ बघायला पाहिजे होता. ती महिला स्वत: म्हणते माझा अपमान झाला, मला राग आला. मग माझ्यावर कलम ३५४ लावण्यासाठी हे निकष आहेत का? काही न वाचता फक्त गुन्हे दाखल केले जातात. माझ्याविरुद्ध तडीपारीची नोटीस काढायची, असा डाव सध्या शिजत असल्याचा आरोप

 

Jitendra Awhad PC
जितेंद्र आव्हाड

हायलाइट्स:

  • जितेंद्र आव्हाड यांचा पोलिसांवर आरोप
  • जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा
ठाणे: माझ्यावर विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आता संबंधित महिलेला माझ्या नावाने धमकीचे खोटे फोन केले जात आहेत. माझ्यावर पाचपेक्षा जास्त गुन्हे दाखल करून माझ्याविरुद्ध तडीपारीची नोटीस काढायची, असा डाव सध्या शिजत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला. मी माझा राजीनामा माझ्या बापाकडे दिला आहे. आता ते पुढील निर्णय ते घेतील, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. ते मंगळवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा, शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, स्पष्ट शब्दात नाराजी
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही ताशेरे ओढले. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी तो व्हिडिओ बघायला पाहिजे होता. ती महिला स्वत: म्हणते माझा अपमान झाला, मला राग आला. मग माझ्यावर कलम ३५४ लावण्यासाठी हे निकष आहेत का? काही न वाचता फक्त गुन्हे दाखल केले जातात. मला पोलिसांची एक गोष्ट आवडते. कारवाई करताना त्यांना काही विचारलं की, ते म्हणतात, साहेब काय सांगू ओ तुम्हाला, तुमचे आणि आमचे संबंध किती चांगले आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. पण वरुन खूप दबाव आहे, असे पोलिसांकडून सांगितले जाते. हवालदार, सब इन्स्पेक्टर, इनस्पेक्टर, एसीपी, डीसीपी, अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त अगदी पोलीस आयुक्तांना विचारलं तरी प्रत्येक अधिकारी आमच्यावर वरून दबाव आहे, असे सांगतो. कायदा बाजूला ठेवावा लागतो, अशाप्रकारचा दबाव कोण टाकत आहे, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
वडिलांवरील आरोप म्हणजे आमच्यावरच व्यक्तीगत हल्ला; आव्हाडांच्या मुलीने खंबीरपणे मांडली बाजू

मी तिला हाताने बाजूला सारलं नसतं तर अनर्थच घडला असता: जितेंद्र आव्हाड

कळव्यात जो कार्यक्रम पार पडला त्यावेळी संपूर्ण गर्दीत फक्त एकच स्त्री होती. मी मुख्यमंत्र्यांना भेटून एका बाजूने पुढे निघालो. मी एका साईडला श्रीकांत शिंदे यांना ढकलून मागच्या बाजूला गाडीकडे पाठवले. मी पोलिसांना पार करून पुढे आलो. मी त्यावेळी गाडीला चिकटलो होतो. तेव्हा त्या बाई मुद्दाम माझ्या समोरुन चालत आल्या. मी त्यांना बाजूला केलं नसतं तर त्या माझ्या अंगावर आपटल्याच असत्या. त्या बाई माझ्या अंगावर आदळल्या असत्या तर मला बचावाचा कुठलाही चान्स मिळाला नसता. मग त्या बाईंनी आरोप केला असता जितेंद्र आव्हाड स्वत:हून माझ्या अंगावर आले, असे जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here