मोहम्मद वकार त्याचा मित्र झैद मोहम्मद आणि काजलसोबत विजय नगरातून बापट चौकात जात होता. भंडारी रुग्णालयासमोर दुचाकीवर असताना त्यानं सिगारेट पेटवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात दुचाकीचा तोल गेला. भरधाव वेगात धावणारी दुचाकी थेट दुभाजकावर आदळली. वकार घटनास्थळी बेशुद्ध पडला.
मोहम्मदचा मित्र झैदच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर मागे बसलेल्या काजलला फार इजा झालेली नाही. दुर्घटनेनंतर स्थानिक मोठ्या संख्येनं जमले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सुरुवातीला तिघांना भंडारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वकारची परिस्थिती गंभीर असल्यानं त्याला एम. वाय. रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या झैद मोहम्मदची पोलिसांनी चौकशी केली. त्यानं घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. वकार एका हातानं दुचाकी चालवत होता. सिगारेट पेटवण्याचा प्रयत्न करत होता. दुचाकीचा वेग जास्त होता. त्याचवेळी तोल गेला आणि दुचाकी दुभाजकाला आदळल्यानी माहिती झैदनं पोलिसांना दिली. पोलिसांनी मृत वकारविरोधात बेजबाबदारपणे दुचाकी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.