आफताबनं श्रद्धाचा मृतदेह आधी बाथरुममध्ये ठेवला. नंतर त्यानं एक फ्रीज खरेदी केला. श्रद्धाच्या मृतदेहाचे त्यानं करवतीनं ३५ तुकडे केले. ते फ्रीजमध्ये ठेवले. रोज एक तुकडा पिशवीत भरून रात्री २ वाजता आफताब निघायचा. मृतदेहाचा तुकडा जंगलात फेकून द्यायचा. कित्येक दिवस हा घटनाक्रम सुरू होता. या कालावधीत आफताब सामान्य आयुष्य जगत होता. त्यानं श्रद्धा वापरत असलेल्या क्रेडिट कार्डची बिलं भरली. क्रेडिट कार्ड कंपन्यांनी श्रद्धाच्या मुंबईतील पत्त्यावर संपर्क साधू नये म्हणून त्यानं बिलं भरून टाकली.
कॉल सेंटरमध्ये काम करत असलेल्या श्रद्धाची हत्या १८ मे रोजी झाली. मात्र ९ जूनपर्यंत तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट ऍक्टिव्ह होतं. श्रद्धाच्या मित्रमैत्रिणींच्या मेसेजेसना आफताब उत्तरं देत होतं. त्यामुळे श्रद्धा फोन घेत नसली तरीही मित्र परिवाराला तिची माहिती मिळत होती. मेसेजेसना रिप्लाय येत होते. मात्र ९ जूनपासून रिप्लाय थांबले. श्रद्धाचं अकाऊंट इनऍक्टिव्ह झालं आणि मित्रांना शंका आली.
श्रद्धाच्या नियमित संपर्कात आलेल्यांना मेसेजेसचे रिप्लाय मिळत नसल्यानं त्यांना शंका आली. काहींनी तिच्या वडिलांशी, भावाशी संपर्क साधला. वडिलांनी पोलीस ठाणं गाठलं. सुरुवातीला आफताबनं पोलिसांची दिशाभूल केली. आपण बऱ्याच कालावधीपासून श्रद्धाच्या संपर्कात नसल्याचं त्यानं सांगितलं. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच आफताबनं तोंड उघडलं आणि धक्कादायक हत्याकांडाचा पर्दाफाश झाला.
Home Maharashtra shraddha murder case, श्रद्धाचं इन्स्टा ऍक्टिव्ह ठेवलं, क्रेडिट कार्डची बिलं भरली; पण...
shraddha murder case, श्रद्धाचं इन्स्टा ऍक्टिव्ह ठेवलं, क्रेडिट कार्डची बिलं भरली; पण एक चूक आफताबला महागात पडली – shraddha death case aftab messaged shraddhas friends on instagram paid her credit card bills
मुंबई: पालघरची रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकरची दिल्लीत निर्घृण हत्या झाली. प्रियकर आफताब अमीन पुनावालानं श्रद्धाला निर्घृणपणे संपवलं. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते ठेवण्यासाठी एक फ्रिज आणला. आफताब श्रद्धाच्या मृतदेहाचा एक तुकडा घेऊन रोज रात्री २ वाजता घरातून निघायचा. मृतदेहाचा तुकडा जंगलात फेकून तो घरी परतायचा. श्रद्धाच्या हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे.