मुंबई: प्रेमात माणूस बदलतो असं म्हणतात. मात्र तो कसा बदलतो यावर त्याच्या आयुष्याची दिशा आणि दशा ठरते. प्रेमात पडल्यावर सारं जग सुंदर वाटू लागत असं म्हणतात. मात्र काहींसोबत नेमकं उलट घडतं. त्यांना केवळ एक व्यक्ती जग वाटू लागते आणि इतर जगाशी त्यांना काहीच देणंघेणं नसतं. मूळची पालघरची रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकरसोबत असंच घडलं.

श्रद्धा वालकर आफताब पुनावालाच्या प्रेमात वाहवत गेली. ती कुटुंबाच्या फारशा संपर्कात नव्हती. श्रद्धाचे वडील विकास वालकर आणि तिचे मित्र लक्ष्मण नाडर आणि रजत शुक्ला यांच्या दाव्यामुळे अनेक प्रश्न समोर आले आहेत. विकास वालकर, नाडर आणि शुक्ला यांनी केलेले दावे विचारात पाडणारे आहेत. आफताब पुनावालासोबतच्या मैत्रीनंतर श्रद्धा बदलली. आफताबला भेटण्यापूर्वीची श्रद्धा फार वेगळी होती, असं या तिघांनी सांगितलं.
श्रद्धाचं इन्स्टा ऍक्टिव्ह ठेवलं, क्रेडिट कार्डची बिलं भरली; पण एक चूक आफताबला महागात पडली
श्रद्धा पुनावालाला भेटण्यापूर्वी पूर्णपणे वेगळी होती. ती अतिशय प्रेमळ आणि महत्त्वाकांक्षी होती. पण आफताबला भेटल्यानंतर श्रद्धा बदलली. तिनं माझ्याशी बोलणं टाकलं. ती आईशी क्वचितच बोलायची. आईच्या मृत्यूनंतर मला तिची फारच चिंता वाटू लागली, असं श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी सांगितलं. त्या मुलासोबतचे तिचे संबंध बिघडल्याचं मला समजलं होतं. मी तिला रोखण्याचा प्रयत्न केला. पण तिनं ऐकलं नाही, असं वालकर म्हणाले.
बारावीपर्यंत शिक्षण, मग BBAला ऍडमिशन, अनेक तरुणींशी संबंध; आफताबबद्दलची बरीच माहिती समोर
आफताबला भेटल्यानंतर श्रद्धामध्ये अनेक बदल झाले. ती आमची श्रद्धा राहिली नव्हती, असं श्रद्धाच्या मित्रांनी सांगितलं. आफताब आणि श्रद्धाचे अनेकदा वाद व्हायचे. २०२० मध्ये त्यांचा एक वाद टोकाला गेला. त्यावेळी श्रद्धानं मला मेसेज केला होता, असं लक्ष्मण नाडरनं सांगितलं. ‘श्रद्धानं मला व्हॉट्स ऍपवर एक मेसेज केला होता. तुम्ही आता मला घरातून बाहेर न काढल्यास आफताब माझी हत्या करेल, असा मेसेज तिनं केला. आम्ही तिच्या मदतीला गेलो. आफताबला पोलीस तक्रार करण्याची धमकी दिली. आम्ही तक्रार नोंदवणार होतो. मात्र श्रद्धानंच आम्हाला रोखलं. त्यामुळे आम्ही तिथून निघून गेलो,’ असा घटनाक्रम नाडरनं सांगितला. श्रद्धाशी संपर्क होत नसल्याची माहिती नाडरनंच श्रद्धाच्या वडिलांना दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here