Maharashtra Political crisis | शिवसेना पक्षात फूट पाडताना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र, प्रत्यक्षात मोदी आणि शाह यांना अपेक्षित असलेली राजकीय गणिते फसली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोदी-शाहांचा अपेक्षाभंग झाला आहे, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला. ते मंगळवारी दौंड येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

 

Modi Shah Eknath Shinde
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

हायलाइट्स:

  • मोदी-शाहांचा उद्धव ठाकरेंबाबतचा एक अंदाज फसला
  • एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार पक्षातून बाहेर पडले
पुणे: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि शिंदे गटात सुरु असलेला राजकीय सत्तासंघर्ष अजूनही कोणत्याही निष्कर्षाप्रत आलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष खिळखिळा होऊन मोडून पडेल, असा अंदाज सुरुवातीला अनेक राजकीय तज्ज्ञांकडून वर्तविला जात होता. पण आतापर्यंतची परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांनी मैदानात उतरून दोन हात केल्यामुळे शिवसेना पक्षातील एक मोठा गट अजूनही ठाकरेंच्या बाजूने आहे. नेमका हाच धागा पकडत ठाकरे गटात नव्यानेच प्रवेश केलेले नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. शिवसेना पक्षात फूट पाडताना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र, प्रत्यक्षात मोदी आणि शाह यांना अपेक्षित असलेली राजकीय गणिते फसली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोदी-शाहांचा अपेक्षाभंग झाला आहे, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला. ते मंगळवारी दौंड येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्रातील सद्य राजकीय परिस्थितीविषयी भाष्य केले. शिवसेनेशी गद्दारी करून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार पक्षातून बाहेर पडले. मात्र, सर्वसामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिले, त्यामुळेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद व जनतेची सहानुभूती मिळत आहे. एकनाथ शिंदेंनी ४० आमदार फुटल्याने ठाकरे घराण्याची संपूर्ण ताकदच नष्ट होईल, असा अंदाज मोदी-शाहांना होता. परंतु, तसे न घडल्याने एकनाथ शिंदे यांच्याबाबत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा अपेक्षा भंग झाला आहे, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदींची एक कृती आणि उद्धव ठाकरेंनी थेट मध्यावधी निवडणुकांचा अंदाज बांधला; नेमकं काय घडलं?

उद्धव ठाकरेंची चाणाक्ष खेळी

शिवसेनेतील फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोरांवर हल्ला चढवण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. राष्ट्रवादीतून आलेल्या सुषमा अंधारे यांच्याकडे उपनेतेपदाची जबाबदारी दिल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच पक्षात प्रवेश केलेल्या लक्ष्मण हाके यांना उद्धव ठाकरेंकडून प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आणि धनगर समाजाचे सांगोला येथील लढाऊ नेते अशी ओळख असलेल्या हाके यांच्याकडे प्रवक्तेपद देण्यात आल्याने ठाकरे गटाची ताकद वाढण्याची शक्यता आहे.
शिंदे-फडणवीसांचे वाभाडे काढणाऱ्या ‘सामना’च्या पहिल्या पानावर मोदी आणि एकनाथ शिंदेंची जाहिरात
धनगर समाजातील युवकांमध्ये लोकप्रिय असलेल्या लक्ष्मण हाके यांना प्रवक्तेपदाच्या रुपाने संधी मिळाल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला माढा, बारामती, सांगली, परभणी यासह धनगर बहुसंख्य असणाऱ्या ११ लोकसभा मतदारसंघात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here