नवी दिल्ली : ‘रशिया व युक्रेन यांच्यात सुरू असलेला संघर्ष हा शस्त्रसंधी व चर्चेनेच सोडविण्याची गरज आहे,’ याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केला. जी-२० परिषदेत मंगळवारी अन्न आणि ऊर्जा सुरक्षा या सत्रात मोदी यांचे भाषण झाले. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. इंधन निर्यातदार देशांकडून इंधन पुरवठ्यावर घालण्यात येणाऱ्या निर्बंधांनादेखील मोदी यांनी विरोध दर्शवला. शांतता आणि स्थैर्यासाठी गेल्या अनेक दशकापासून भारत काम करीत असून, आमची भूमिका कायम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले.

‘पर्यावरणीय बदल, कोव्हिड साथरोग, युक्रेनमधील घडामोडी आणि त्यातून निर्माण झालेले जागतिक प्रश्न यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण असून, पूर्ण जगाची पुरवठा साखळी उद्ध्वस्त झाली आहे. जगभरात अत्यावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे प्रत्येक देशातील गरीब नागरिकांचा जगण्यासाठीचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी भीषण प्रश्नाकडे लक्ष वेधले व युक्रेन युद्धाच्या विषयाला हात घातला. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लाव्हरोव्ह या जागतिक नेत्यांच्या उपस्थितीतच मोदी यांनी युद्धखोरीविरोधात मत मांडले. ‘युक्रेनच्या समस्येवर शस्त्रसंधी व चर्चेच्या माध्यमातूनच मार्ग काढायला हवा हे मी वारंवार म्हटले आहे. दुसऱ्या महायुद्धामुळे जगाची घडी विस्कटून गेली होती हे लक्षात घ्यायला हवे. पुढील वर्षी ही परिषद गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्या पवित्र भूमीत होईल, तेव्हा जगाला शांतीचा संदेश देण्यावर आपल्यात एकमत होईल, याची मला खात्री आहे,’ असे मोदी म्हणाले.

राज्य नाट्य स्पर्धा : पहिल्याच दिवशी सावरकरप्रेमींचा गोंधळ, नथुराम समर्थनाच्या घोषणा, ते नाटक पाडले बंद
‘युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाकडून कोणत्याही देशाने इंधनखरेदी करू नये,’ असे मत अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांनी या परिषदेत व्यक्त केले होते. या सर्वांचा रोख भारतावर असल्याने मोदी यांनी या आक्षेपास उत्तर दिले. ‘इंधन पुरवठ्यावर घालण्यात येणाऱ्या निर्बंधांना कोणीही प्रोत्साहन देता कामा नये आणि इंधनाच्या बाजारपेठेत स्थैर्य राहील याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्बन उत्सर्जनाच्या प्रश्नी पाश्चात्य देशांनी भारतावर केलेल्या टीकेलादेखील मोदी यांनी उत्तर दिले. ‘सन २०३०पर्यंत आमच्या देशातील अर्ध्यापेक्षा अधिक वीज ही पुनर्निमित ऊर्जेच्या माध्यमातून उत्पादित केली जाईल. ऊर्जानिर्मिती क्षेत्रात आवश्यक ते स्थित्यंतर घडण्यासाठी विकसनशील देशांना कालबद्ध पद्धतीने वाजवी अर्थसाह्य व तंत्रज्ञानविषयक पुरवठा करण्याची गरज आहे,’ असे ते म्हणाले.

जगभरात अत्यावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे

पुढील वर्षी ‘जी-२०’ परिषद गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्या पवित्र भूमीत होईल, तेव्हा जगाला शांतीचा संदेश देण्यावर आपल्यात एकमत होईल, याची मला खात्री आहे. जगभरात अत्यावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे प्रत्येक देशातील गरीब नागरिकांचा जगण्यासाठीचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. युद्धाचा प्रश्न चर्चेतूनच सुटेल, असंही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार ते रामदास कदम, मातोश्रीवर टीका करणाऱ्या नेत्यांना अंधारेंनी सुनावलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here