Thane News : कौटुंबिक वादातून सून घर सोडून गेली आणि त्याबाबत मुलाला दोषी धरत त्याला सतत टोमणे मारणे अंबरनाथमधील एका वडिलांच्या जिवावर बेतले आहे. वडिलांच्या सततच्या टोमण्यांमुळे राग अनावर झालेल्या अंबरनाथ येथील एका तरुणाने वडिलांना केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

 

Crime News
बायको घर सोडून गेली, बापाचे पोराला सतत टोमणे; संतापलेल्या मुलाने केलं असं काही…
ठाणे : कौटुंबिक वादातून सून घर सोडून गेली आणि त्याबाबत मुलाला दोषी धरत त्याला सतत टोमणे मारणे अंबरनाथमधील एका वडिलांच्या जिवावर बेतले आहे. वडिलांच्या सततच्या टोमण्यांमुळे राग अनावर झालेल्या अंबरनाथ येथील एका तरुणाने वडिलांना केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तरुणाला अटक केली आहे.

अंबरनाथ पूर्वेतील दत्तकुटीर परिसरात देविदास किसन सूर्यवंशी (वय ६०) आपल्या कुटुंबासोबत राहत होते. त्यांचा मुलगा प्रकाश रिक्षाचालक आहे. कौटुंबिक वादातून प्रकाशची पत्नी काही दिवसांपूर्वी त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. यावरून प्रकाशचे वडील देविदास त्याला सतत टोमणे मारत होते. पत्नीचे निघून जाणे आणि घरात वडिलांकडून होणारा अपमान यामुळे प्रकाशचे मानसिक संतुलन बिघडले होते. रविवारी संध्याकाळी प्रकाश घरी आला. तो जेवण करण्यासाठी बसला असता देविदास यांनी त्याला पुन्हा पत्नी सोडून गेल्याच्या कारणावरून बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या प्रकाशने घरातील एक लाकडी फळी थेट देविदास यांच्या डोक्यात मारली. या मारहणीत त्यांचा मृत्यू झाला.

भारताची शांततेची साद; रशिया-युक्रेन संघर्ष चर्चेतूनच सोडवण्याचा PM नरेंद्र मोदी यांचा आग्रह
कौटुंबिक हिंसेतून झालेल्या हत्येची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. देविदास यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी प्रकाशविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांनी दिली आहे.

गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार ते रामदास कदम, मातोश्रीवर टीका करणाऱ्या नेत्यांना अंधारेंनी सुनावलं

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here