औरंगाबाद : गोपाल टी ते शिवाजी हायस्कूल परिसरात रिक्षातून प्रवास करणारी अल्पवयीन मुलगी रिक्षात एकटी असल्याचे फायदा उचलून रिक्षा चालकाने अश्लील प्रश्न विचारण्यास आणि अश्लील चाळे करण्यात सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने धावत्या रिक्षातून उडी मारून स्वत:ची सुटका केली. या प्रकरणात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणारा रिक्षाचालक सय्यद अकबर सय्यद हमीद (वय ३९, रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) याला क्रांती चौक पोलिसांनी ताब्यात घेतले.

याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लास करणारी एक अल्पवयीन (१७ वर्षीय) मुलगी गोपाल टी ते शिवाजी हायस्कूल येथे जाण्यासाठी रिक्षात बसली. रिक्षात ती एकटी असल्याची संधी साधून रिक्षाचालकाने तिच्याशी अश्लील संवाद सुरू केला आणि रिक्षा वेगात नेण्यास सुरुवात केली. मात्र, मुलीने प्रसंगावधान राखून रिक्षातून बाहेर उडी घेतली.

भारताची शांततेची साद; रशिया-युक्रेन संघर्ष चर्चेतूनच सोडवण्याचा PM नरेंद्र मोदी यांचा आग्रह
ही घटना १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ च्या दरम्यान संकल्प क्लासेसच्या समोर सिल्लेखाना ते तारभवन रोडवर घडली. मुलीने रिक्षातून उडी घेतल्याने तिच्या डोक्यास गंभीर इजा झाली. दरम्यान रिक्षाचालकाही पळून गेला. या प्रकरणात १४ नोव्हेंबर रोजी एमजीएम हॉस्पिटल येथून एमएलसी आल्यानंतर या प्रकरणात क्रांती चौक पोलिसांनी सदर रिक्षाचालकाचा शोध सुरू केला. शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून रिक्षा क्रमांक एमएच २० ईएफ १५६२ चा शोध लागला.

या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक विकास खटके, महंमद एजाज शेख, वाहतूक पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, पोलीस अंमलदार संतोष मुदिराज, इरफान खान, संतोष सूर्यवंशी, भावलाल चव्हाण, हनुमंत चाळणेवाड, चालक शेख मुश्ताक, सज्जन जोनवाल यांच्या पथकाने रिक्षाचालक सय्यद अकबर सय्यद हमीद याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल सोनवणे करीत आहेत.

गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार ते रामदास कदम, मातोश्रीवर टीका करणाऱ्या नेत्यांना अंधारेंनी सुनावलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here