Kalyan News : टिटवाळाला रेल्वे स्थानकात आज रेल्वे प्रवाशांनी सकाळीच आंदोलन केले. रोजच लोकल उशिरा येत असल्याने प्रवाशी संतप्त झाले होते.

 

titwala railway station
टिटवाळा स्थानकात राडा, लोकल ट्रेन उशिराने येत असल्याने संतप्त प्रवाशांचे आंदोलन
कल्याण : टिटवाळामध्ये संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील वातावरण तणावाचं बनलं होतं. प्रवाशांनी ८.१९ लोकल रोखून ठेवली होती. रेल्वे रूळावर उतरून प्रवाशांनी हे आंदोलन केलं. पोलिसांनी प्रवाशांना हटवलं. आणि लोकल पुढे काढण्यात आली. लोकल ट्रेन उशिरा येत असल्याने प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी हे आंदोलन केलं.

मुंबईकडून येणाऱ्या लोकल सतत उशिराने येत असल्याने संतप्त झालेल्या प्रवासी थेट रेल्वे रूळावर उतरले आणि त्यांनी रेल रोकोचा प्रयत्न केला. प्रवाशांनी रेल्वे रूळावर उभं राहून १५ मिनिटं आंदोलन केलं. मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात आज सकाळी हा प्रकार घडला. मात्र प्रवासी रेल्वे रुळांवर उतरल्याने गाड्यांचे वेळापत्रक काहीसे कोलमडले आहे.

मुंबईकडून येणाऱ्या लोकल गाड्या सतत उशिराने येत असल्याने प्रवाशांना कामावर जायलाही उशिर होत होतो. आजही तसाच प्रकार घडल्याने तब्बल १५ ते २० मिनिटं लोकल उशिराने येत असल्याने प्रवाशांच्या सहनशिलतेचा अंत झाला आणि ते थेट रेल्वे रुळांवर उतरले. प्रवासी १५ मिनिटांनी रेल्वे रुळावर होते. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत या प्रवाशांना बाजूला करत रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू केली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here