मुंबई: भारतीय शेअर बाजाराची आजची सुरुवात घसरणीने झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात आज लाल चिन्हाने झाली आहे. सेन्सेक्समध्ये ३०० अंकांनी घसरण झाली, पण निफ्टी सपाट सुरुवातीत व्यवहार करत आहे. ऑटो, मीडिया, फार्मा, पीएसयू बँक निर्देशांकात सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दिसत आहे.

शेअर बाजाराची सुरुवात
आजच्या व्यवहारात बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स १६४.३६ अंकांनी म्हणजेच ०.२७ टक्क्यांनी घसरून ६१,७०८.६३ वर उघडला. दुसरीकडे, एनएसईचा ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टी ५.१५ अंकांच्या घसरणीसह १८,३९८.२५ वर उघडला. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी १३ समभागांचे तेजीने व्यवहार होत असून १७ समभागांमध्ये घसरण होत आहे. याशिवाय निफ्टीच्या ५० पैकी २१ समभागांमध्ये तेजी दिसून येत असून २९ समभागांमध्ये घसरण नोंदवली जात आहे.

या IPO मध्ये पैसे लावलेल्यांना धक्का; पदार्पणातच शेअर्सची घसरण, गुंतवणूकदारांनी आता काय करावं?
दुसरीकडे, अमेरिकन बाजाराबद्दल बोलायचे झाले तर ते हिरव्या चिन्हावर बंद झाले आहेत. मंगळवारी डाऊ जोन्स ५६.२२ अंकांनी वधारला आणि ३३,५९२.९२ च्या पातळीवर बंद झाला. तसेच S&P ५०० निर्देशांक ०.८७ टक्क्यांनी वाढून ३,९९१.७३ च्या पातळीवर तर नॅसडॅक १.४५ टक्क्यांनी वाढून ११,३५८.४१ च्या पातळीवर बंद झाला.

अदानींच्या झोळीत आणखी एक कंपनी; बातमी येताच गुंतवणूकदारांमध्ये धडपड, शेअरला अप्पर सर्किट
आजची क्षेत्रीय निर्देशांकाची वाटचाल
आज क्षेत्रीय निर्देशांकात आर्थिक समभागांमध्ये घट झाली आहे. याशिवाय एफएमसीजी, धातू, रियल्टी, ग्राहकोपयोगी वस्तू आणि तेल आणि वायू समभागांमध्ये घसरणीचे लाल चिन्ह दिसत आहे. याशिवाय आयटी, पीएसयू बँक, फार्मा, प्रायव्हेट बँक, फार्मा आणि हेल्थकेअर इंडेक्स या क्षेत्रांमध्येही तेजीचा व्यवसाय दिसून येत आहे.

पैशाचा पाऊस पडणार! टाटांचा हा शेअर ५ हजारपार जाऊ शकतो, झुनझुनवालांचा होता आवडता स्टॉक
काल बाजार तेजीसह बंद झाला
काल, मंगळवारच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी मजबूत बंद झाला. ३० शेअर्सचा सेन्सेक्स २८३ अंकांच्या वाढीसह ६१,९०७ वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी ७४ अंकांच्या वाढीसह १८,४०३ वर बंद झाला आहे.

बिकाजी फूड्स आणि ग्लोबल हेल्थ सूचीबद्ध होणार
दरम्यान, आज गुंतवणूकदारांना कमाईची आणखी एक संधी मिळेल. मेदांता ब्रँड अंतर्गत रुग्णालये चालवणारी आणि व्यवस्थापित करणारी कंपनी बिकाजी फूड्स आणि ग्लोबल हेल्थ लिमिटेड या कंपनीसह आज दोन IPO सूचीबद्ध होणार आहेत. बिकाजी फूड्स इंटरनॅशनलच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि इश्यूच्या शेवटच्या दिवशी २६.६७ पट सबस्क्राइब झाला. त्याच वेळी, ग्लोबल हेल्थ आयपीओला सबस्क्रिप्शनच्या शेवटच्या दिवशी ९.५८ पट सबस्क्रिप्शन मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here